एकापेक्षा एक अजरामर गीतांनी उलगडले सावरकर!

Date: May 31st, 2019 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Education, Events, General Knowledge, Geography, History, Latest News, Politics, Wardha
एकापेक्षा एक अजरामर गीतांनी उलगडले सावरकर!

ज्यांनी अंदमानची ‘ती’ कोठडी बघितली तो टीका करूच शकत नाही : मेघे
तभा वृत्तसेवा
वर्धा, २९ मे

जयदेव जय देव शिवराय या

स्तुतीपर गीताने सुरू झालेल्या संगीत कार्यक्रमात प्रत्येक हिंदूची चेतना जागृत करणाऱ्या जाजवल्या स्फूर्ती गीतांच्या प्रत्येक कडव्यातुन सावरकर उलगडत होते. त्या विषमतेचे चित्र पडद्यावर बघताना अंगावर काटे उभे होत होते… एकंदरीत सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात काल २८

रोजी सम्पूर्ण सावरकर उलगडले, अशी प्रतिक्रिया कार्यक्रम सम्पल्यानंतर रसिकांनी दिली.

स्वा. सावरकर पुतळा नागरी समिती, स्वा. सावरकर सेवा समिती व राष्ट्रतेज युवा मंचच्या वतीने स्वा. सावरकर जयंतीनिमित्त स्वा. सावरकर गौरव सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रमात स्वा. सावरकर याच्या गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भचे जेष्ठ नेते दत्ता मेघे याची उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी पुतळा समितीचे अध्यक्ष हरिभाऊ वझुरकर होते. व्यासपीठावर सेवा समितीचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र बोरकर, सत्कारमूर्ती सुरेश पावडे, गौरीशंकर टीबडीवाल, ऍड. मदन काळे यांची उपस्थिती होती.

यावेळी मेघे म्हणाले की, राजकीय स्वार्थापोटी सावरकरांवर ज्या पद्धतीने आरोप केले जात आहेत ते वेदनादायी आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व समर्पित केल्यानंतर भारतात कोणत्याही प्रकारची धन, लौकिक, पद, प्रतिष्ठा, सत्येची अपेक्षा न करणारे सावरकर एकमेव राष्ट्रभक्त आहेत. अंदमानला गेल्यावर तेथील वातावरण, जेल, कोठडीचे ज्यांनी निरीक्षण केले, असा कोणताही व्यक्ती सावरकराणांवर टीका करू शकत नाही, असे स्पष्ट प्रतिसाद मेघे यांनी केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते टाकरखेडा येथील संत लहानुजी महाराज संथांचे अध्यक्ष व माजी कृषी अधिकारी सुरेश पावडे याना शेती आणि गौ सेवेसाठी स्वा. सावरकर गौरव सन्मान देऊन सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना पावडे म्हणाले की, उत्तम शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करून आपण देशसेवा करतो आहोत. रासायनिक खतांनी उत्पन्न जास्त मिळत असले तरी जमिनीचे पोत बिघडते आपण रासायनिक खतांचा वापर करणे टाळल्याने ती भुमातेची सेवा घडते आहे. महागड्या यंत्र तंत्राचा उपयोग न करता शेती कशी संपन्न करता येईल यावर आपण जोर दिला. प्रत्येकाने सेंद्रिय शेती अवलंबली तर आत्महत्या सारखे थांबवणे शक्य होईल आणि हेच स्वप्न सावरकरणासारख्या देशभकानी बघितले होते असे ते म्हणाले.

वझुरकर म्हणाले की, वर्धेसारख्या ऐतिहासिक शहरात सावरकरांचा पुतळा आणि स्मारक निर्मिती ही बाब आपल्यासाठी अभिमानाची आहे. या माध्यमातून युवकांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल, असे ते म्हणाले.

प्रस्थाविक सुवर्ण काळे यांनी केले. सत्कार कार्यक्रमचे संचालन शैलेश देहाडराय यांनी संगीत कारकर्माचे संचालन ज्याती देशपांडे यांनी केले. आभार मदन परसोडकर यांनी मानले.

सत्कार सोहोलयांतर संस्कार भारतिच्या स्वजण्याने आयोजित अनादी मी अनंत मी या संगीत कार्यक्रमात केतकी कुलकर्णी, कवी नेसन, मयूर पटाईत, विभा मुडे, सानिका बोभाटे, सर्वदा जोशी यांनी आपल्या गाण्यातून सावरकरच सभागृहात उभे केले, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. त्यांना वसंत जळीत, नरेंद्र माऊलकर, बंटी चहांडे, राजेंद्र झाडे, मंगेश परसोडकर यांनी संगीत साथ दिली. संगीत संध्येचे नियोजन मकरंद उमालकर, अनिल पखोडे यांनी केले. कार्यक्रमला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik