दिवाळी निमित्य चित्रकला स्पर्धा प्रदर्शन व बालगोपाळांच्या सामुहिक दिवाळी फराळ कार्यक्रम
![दिवाळी निमित्य चित्रकला स्पर्धा प्रदर्शन व बालगोपाळांच्या सामुहिक दिवाळी फराळ कार्यक्रम](http://www.wardhabrahmin.in/wp-content/uploads/2019/11/background.jpg)
मिशन सुर्योदय अंतर्गत आयोजित माझी दिवाळी या चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ तसेच दिवाळीचा सामुहिक फराळा अभ्यंकर्स तंदुर येथे आज ३ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमा अध्यक्ष स्थानी आर्किटेक्ट मकरंद पाठक तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्री.अनिरुध्दजी पांडे जिल्हा प्रतिनिधी तरुण भारत यवतमाळ हे होते. स्पर्धेत एकुण २९ बालगोपाळांनी भाग घेतला.
अ-गटात प्रथम कु.अभिरा देवेंद्र काळे, द्वितीय कु. राधा तकडहट, ब-गटात प्रथम कु. हिंदवी निरज शिंगोटे द्वितीय कु. समिधा मोहरील यांनी पारितोषिक पटकावले. स्पर्धेत भाग घेणार्या सर्वांनाच प्रोत्साहन पर पारितोषिक देवुन संन्मानित करण्यात आले. या वेळी त.भा.चे जिल्हा प्रतिनिधी प्रफुलजी व्यास यांची उत्कृष्ट जिल्हा प्रतिनिधी म्हणुन निवड झाल्या बद्दल मिशन सुर्योदय तर्फे सत्कार करण्यात आला. मंचावर राहुल सराफ,श्रीनिवास लेले,सौ.सविता पाठक उपस्थित होत्या.
पाहुण्यांचे स्वागत शैलेश डेहाडराय व शशांक नानोटी यांनी पुष्पगुच्छ देवुन केले. तर कार्यक्रमाचे सुत्र संचलन उध्दव भुसारी यांनी केले.समारोपीय आभार सारंग आपटे यांनी मानले. स्पर्धा यशस्विते करीता मंदार अभ्यंकर, विवेकजी श्रौती,निरज शिंगोटे,सौ.आरती श्रौती,निलकांत देशमुख,मनोज पारखी यांनी विशेष प्रयत्न केले.
![Swastik](http://www.wardhabrahmin.in/wp-content/themes/brahminunity/images/swastik.png)
![Swastik](http://www.wardhabrahmin.in/wp-content/themes/brahminunity/images/om.png)