मिशन सूर्योदय अंतर्गत आयोजित पाककला स्पर्धा २०२० मधे महिलांनी उत्स्फुर्त पणे सहभाग नोंदवला.

मिशन सूर्योदय अंतर्गत आयोजित पाककला स्पर्धा २०२० मधे महिलांनी उत्स्फुर्त पणे सहभाग नोंदवला. तिळाचे पदार्थ गटात सौ.मुग्धा काळे प्रथम, सौ. शुभांगी कुंटे द्वितीय तर सौ पोर्णिमा दाणी यांनी तृतिय पारितोषिक पटकावले. हलव्याचे दागीने गटात सौ.सोनाली नानोटी,सौ.मुग्धा काळे,सौ.पुजा भुसारी,सौ.अपर्णा पाटील यांनी अप्रतिम दागिन्यांचे प्रदर्शन केले. यांनी आपली परंपरा जपली म्हणुन या चौघींना समान बक्षीस देवुन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन पावस, रत्नागिरी येथील स्वामी स्वरुपानंद सेवा संस्थेचे विश्वस्त श्री हेमंत गोडबोले सपत्नीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन सौ.रेणुका शिंगोटे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परीचय भुषण अग्नीहोत्री यांनी तर आभार सारंग आपटे यांनी मानले.स्पर्धा परिक्षणाची जबाबदारी सौ.मंगलाताई श्रौती यांनी पार पाडली. स्पर्धा संपन्न झाल्या नंतर उपस्थित महिलांचे सामुहीक हळदीकुंकू झाले. कार्यक्रमाच्या यशस्विते करीता सौ आरती श्रौती,सौ पुजा भुसारी, सौ.रुपाली अभ्यंकर,सौ. कल्याणी पारखी यांनी विषेश प्रयत्न केले. यावेळी श्री अरुणकाका लेले यांच्या तर्फे गणपती अथर्वशीर्ष पुस्तीका उपस्थितांना वितरीत करण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप सामुहीक पसायदान म्हणुन करण्यात आला.

