हा लेख तुमचे लाखों रुपये वाचवेल व तुम्हाला करोड़पति सुद्धा बनवेल – प्रा. डॉ. श्रीकांत बावसे

हा लेख तुमचे लाखों रुपये वाचवेल व तुम्हाला करोड़पति सुद्धा बनवेल
भारतातील प्रत्येक व्यक्ति नोकरी लागल्या बरोबर जर पहिली कोणती गुंतवणूक करत असेल तर ती म्हणजे लाइफ इन्शुरन्स मधे!
परंतु लाइफ इन्शुरन्स ही गुंतवणूक नसून केवळ अनपेक्षित आघात झाल्यावर आपल्या परिवाराला पूर्ववत परिस्थिति मधे आणणे
आणि
कुटुंबास आर्थिक स्थैर्य प्रदान करणे हेच लाइफ इन्शुरन्स चे कार्य आहे.
भारतामधील मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय लोक साधारणतः २५ ते ३० लाखाचा परंपरागत विमा काढतात ज्यामधे
त्यांना वर्षाकाठी तब्बल १ ते १.५० लाख रूपये प्रीमियम भरावे लागते.
परंतु १० वर्षांनी १ लाख १५ वर्षांनी ३ लाख २० वर्षांनी ५ लाख असे काही तरी मिळण्याच्या अपेक्षेने यामधे मध्यमवर्गीय लोकांद्वारे गुंतवणूक करण्यात येते.
यात लक्षात घेण्याच्या दोन महत्वाच्या गोष्टी:-
१. आपण प्रीमियम दरवर्षी लाखों रूपये भरत आहात परंतु
त्यातील काही भाग आपल्याला
५ – १० – १५ – २० वर्षांनी टप्पा टप्प्याने अत्यल्प व्याजदराने वापस मिळत आहे.
२. अपघाती मृत्यु झाल्यास २५ – ३० लाख रुपये ज्यामधे आपल्या कुटुंबा मधील
अ)मुलामुलींचे शिक्षण
ब) त्यांचे लग्न
व
क) परिवाराचा उदरनिर्वाह
या सर्व गोष्टी आजच्या महागाई दराप्रमाणे होणे अतिशय कठीण आहेत.
आता यावर उपाय काय?????
लाइफ इन्शुरन्स काढतांना केवळ टर्म प्लान काढा!!!
यामधे आपणास तब्बल १ करोड़ चा टर्म प्लान अत्यंत कमी दरात म्हणजे २२ ते २८ हजार प्रतिवर्षाला मिळुन जाईल.
हा प्लान ४० ते ४५ वर्षासाठी राहील. परंतु या अवधी मधे मृत्यु न झाल्यास आपणास एकही रुपया परत मिळणार नाही!!!
आता इथे आपण अत्यंत सोपे उदाहरण घेऊ,
आपण वर्षाला जर २५ हजार प्रीमियम भरत आहोत
तर दहा वर्षात आपण केवळ २.५ लाख रुपये भरत आहे आणि
जर दहा वर्षाच्या आत मृत्यु आल्यास आपल्या कुटुंबाला १ करोड़ रूपये मिळतील.
या उलट परांपरागत प्लान मधे दहा वर्षांनी मृत्यु आल्यास केवळ २५ ते ३० लाख रुपये मिळतील.
टर्म प्लान मधे २० वर्ष आपण ५ लाख भरले आणि नंतर मृत्यु आल्यास १ करोड़!!!
३० वर्ष ७.५ लाख आणि नंतर मृत्यु आल्यास १ करोड़!!!
४० वर्ष १० लाख आणि नंतर मृत्यु आल्यास १ करोड़!!!
आता टर्म प्लान मधे आपण परांपरागत प्लान पेक्षा दरवर्षी ७० ते ८० हजार रुपये वाचवत आहोत.
हेच वर्षाकाठी वाचलेले ७० ते ८० हजार रूपये जर
चांगल्या लार्ज कैप म्यूच्यूअल फंड मधे एसआयपी द्वारे दर महिन्याला ४० ते ४५ वर्षांसाठी गुंतविले तर
इतक्या प्रदीर्घ अवधी मधे नक्कीच जबरदस्त परतावा मिळेल.
हा परतावा परंपरागत इन्शुरन्स मधे वापस मिळणाऱ्या पैशांपेक्षा कितीतरी अधिक असेल.
त्यामुळे टर्म प्लान + लार्ज कैप म्यूच्यूअल फंड मधे एसआयपी द्वारे प्रदीर्घ काळ्साठी गुंतवणूक आपल्याला नक्कीच श्रीमंत बनवेल.
योग्य वेळेस योग्य ठिकाणी गुंतवणुक करा आणि श्रीमंत व्हा!!!
आपलाच
प्रा. डॉ. श्रीकांत बावसे

