श्रीमंती चा राजमार्ग १

Date: February 2nd, 2020 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in General Knowledge, Share Market
श्रीमंती चा राजमार्ग १

जगातील प्रत्येक व्यक्ति पैसा कमवायला दिवस रात्र मेहनत करत असतो. परंतु यापैकी केवळ १% लोकच अतिशय श्रीमंत होऊ शकतात. याचे मुळ कारण म्हणजे ९९% लोकांना पैसा कमवायचा योग्य मार्ग अवगत नसतो. आणि चुकीच्या मार्गावर वेगाने धावुन काहीही अर्थ नसतो.

जगात श्रीमंत होण्याचे फक्त दोनच मार्ग आहेत!!!

मार्ग १:- स्वतःची छोटी कंपनी टाका तिला मोठी करा.
नंतर तिचे शेअर्स,
मार्केट मधे विका आणि भांडवलदार पद्धती प्रमाणे श्रीमंत बना.

मार्ग २:- चांगल्या कंपनीज चे शेअर्स विकत घ्या आणि त्यांचे मालक बना.

लक्षात ठेवा मालकापेक्षा नोकर कधीच श्रीमंत होऊ शकत नाही.

कोणी कितीही मोठी नोकरी केली तरी पगार हा कंपनीच्या नफ्यापेक्षा कमीच राहील.

मालक नफा कमवतो आणि नोकर पगार!

स्वतःला उद्योगाची निवड करतांना पैश्यांची / जागेची/टेक्नोलॉजी/ अनुभव इ. ची अड़चण येऊ शकते
परंतु चांगल्या कंपनीजच्या शेअर्स मधे कोणीपण, कधीपण, कितीही गुंतवणूक करू शकतात.

आता छोट्या गुंतवणूकदाराने शेअर मार्केट मधे गुंतवणूक कशी करायची हा स्वाभाविक प्रश्न!

शेअर मार्केट हा पैश्यांचा समुद्र आहे. यामधुन किती पैसा कमवता येईल याला सीमा नाही.

आता आपल्याला जर पोहणे शिकायचे आहे तर पहिले आपण स्विमिंग टैंक मधे अनुभवी प्रशिक्षकाद्वारे शिकायला सुरुवात करू.
याचप्रमाणे मार्केट मधे गुंतवणूक करायला सुरुवात करायच्या आधी,
प्रथम आपण म्यूच्यूअल फंडा मधे दरमहा एका विशिष्ट रकमेची गुंतवणूक करावी.
यात तज्ञ व अनुभवी फंड मैनेजर लाखों लोकांचे पैसे मार्केट मधे आपल्या विश्लेषणाद्वारे गुंतवत असतो.

कमी वय व जास्त जोखिम घेऊ इच्छीणारयांनी इक्विटी म्यूच्यूअल फंडा मधे पैसा गुंतवावा. यामधे सर्व पैसा शेअर मार्केट मधे गुंतवल्या जाईल.

मध्यम वय व मध्यम जोखिम घेऊ इच्छीणारयांनी बैलेंस्ड फंड मधे पैसा गुंतवावा.यामधे अर्धा पैसा बॉन्ड्स व अर्धा पैसा शेअर मार्केट मधे गुंतवल्या जाईल.

सर्वात महत्वाचे म्हणजे वरील दोन्ही ठिकाणी आपल्याला दरमहा गुंतवणूक करायची आहे!
जेणेकरून,

मार्केट वर गेल्यावर आपल्या फंडस च्या यूनिट्स चे रेट्स वाढतील आणि मार्केट खाली आले तर आपल्याला जास्त यूनिट्स मिळतील.

दिर्घ अवधी मधे चक्रवाढ दराने ही पद्धत आपणास करोड़पति बनवेल यात शंका नसावी.

या नंतर ची पुढील पायरी म्हणजे नदी मधे पोहणे म्हणजेच थेट शेअर्स मधे गुंतवणुक जी आपण शिकू आपल्या पुढील सदरात पुढल्या रविवारी.

आपल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला आम्हाला नक्की आवडेल!

आपलाच
प्रा.डॉ. श्रीकांत बावसे
८९९९०४२१५७
वर्धा


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik