व्यक्तिमत्व विकास भाग:२

Date: February 4th, 2021 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Education, Latest News, Wardha, World News
व्यक्तिमत्व विकास भाग:२

प्रिय,पालक व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नमस्कार.

व्यक्तिमत्व विकास या लेखमालिकेत पहिल्या लेखात आपण Personality development या विषयाची प्रास्ताविक समजून घेतले होते
आज आपण दोन मुद्दयांवर बोलणार आहोत उत्तम आरोग्य आणी सादरीकरण या मुद्दयांवर माहिती घेणार आहोत.

असे म्हटले जाते कि health is wealth आणी a sound mind in sound body is a basic necessity याचा अर्थ कि आरोग्यम धनसंपदा.आपली प्रकृती आपण सांभाळली पाहिजे.निरोगी आणि निर्व्यसनी व्यक्ती नेहमी प्रसन्न दिसतात व प्रकृती बिघडल्यामुळे मुळे कुठेही गैरहजेरी लागत नाही. दररोज सकस आहार घ्यावा थोड्या व्यायाम नियमित करावा थोडा वेळ मनोरंजनासाठी जरूर दयावा आजकाल fast food चे खूप आकर्षण हे हे चवीला जरी चांगले असले तरी त्यात फारसा सकस आहार नसतो त्यामुळे असे पदार्थ अगदीच नाही तरी शक्यतो कमीत कमी खावे आणि तसेच रोज किमान ६ ते ७ तास शांत झोप घेणे तेवढेच महत्वाचे आहे. असे केल्याने आपले आरोग्य उत्तम राहील आणि रोगप्रतिकारशक्ती वाढेल व अभ्यासात आणि दैनंदिन कामात लक्ष लागेल आणि आपली efficiency वाढेल.

पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपले सादरीकरण. एक उदहरण देते आपण रोज tv पाहतो त्यात येणाऱ्या जाहिरीती किती कमी वेळ असतात पण त्या आपल्याला लक्षात राहून जातात कारण अगदी कमी वेळात बहुतेक सेकंदात त्या त्यांच्या product चे महत्व अगदी आकर्षकपणे मांडतात आणि सारखे ते आपल्या मेंदूवर hammer करत असतात त्याच प्रमाणे वियार्थ्याना पेपर लिहताना, प्रोजेक्ट,assingnment किवा तोंडी परीक्षा देताना आपला मुद्दा योग्य त्या शब्दात सुबक अक्षरात नीटनेटकेपणाने केल्यास जास्ती गुण आणि यश मिळण्याची शक्यता वाढते.

वैयक्तिक अभ्यासाबद्दलच्या व व्यक्तिमत्व विकास बद्दल प्रत्येक्ष किवा ऑनलाइन समुपदेशन घेण्यासाठी किवा अधिक माहिती साठी आपण मला माझ्या मोबाईल नंबर वर संपर्क करू शकता.

क्रमक्ष:

सौ संध्या उपेंद्र जोशी
वरिष्ठ समुपदेशक
मो: +९१ ९४२२२९६०९४


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik