व्यक्तिमत्व विकास भाग: ३

प्रिय,पालक व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नमस्कार.
व्यक्तिमत्व विकास या लेखमालिकेत पहिल्या लेखात आपण Personality developement या विषयाची प्रास्ताविक समजून घेतले होते व दुसऱ्या लेखामध्ये उत्तम आरोग्य आणी सादरीकरण या मुद्दयांवर माहिती करून घेतली होती.आज आपण महत्वाच्या अश्या दोन मुद्दयांवर बोलणार आहोत.
पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रेरणा ,आपण मोठ्यान्कडून आई वडिलांकडून प्रेरणा घेऊ शकतो किवा आपल्या क्षेत्रातील आदर्श व्याक्तीडून आपल्याला प्रेरणा मिळते जसे कि कोणी जर क्रिकेट खेळाडू असेल तर तो त्याच्या आवडत्या क्रिकेटपटू कडून प्रेरणा घेऊ शकतो. असे केल्याने आपण आपल्या कामची गुणवत्ता वाढवू शकतो.एका श्रीमंत व्यक्ती ने सांगितले होते कि तो लहानपणी खूप गरीब होता पण त्याच्या आईच्या डोळ्यातून विश्वास दिसायचा आणि संघर्ष करण्याची प्रेरणा मिळायची याच प्रेरणेतून त्याने शिक्षण पूर्ण केले आणि आजचा दिवस तो पाहत आहे. विद्यार्थ्यांनी मनोमनी स्वप्रेराणा घ्याची आणि अभ्यासात यश मिळवायचे.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सकारात्मकता.बरेच वेळा आपले मन नकारार्थी विचार करते जसे कि एखादी गोष्ट अवघड आहे आपल्याला जमणारच नाही असा विचार मनात येतो.कोणाला जर गणित हा विषय अवघड वाटत असला तर आपल्याला ते जमणारच नाही म्हणून आपण त्याला टाळायला लागतो दोन हात दूर राहतो त्याचा अभ्यास करत नाही म्हणून आपल्याला कमी गुण मिळतात किवा नापास होतो व मग हा गैरसमज अजून दृढ होतो म्हणूनच जर आधीपासून सकारात्मक दुर्ष्टीकोन ठेवल्यास हे टाळता येऊ शकते म्हणूनच मी हे करू शकतो मी प्रयत्न केल्यास हे मला नक्की जमेल अवघड असला तर मी कोणाची मदत घेईल पण आधीच नाही म्हणून प्रयत्न करणार नाही असे मी नाही करणार असा निश्चय करा.
म्हतात ना IMPOSSIBLE is ITSELF I M POSSIBLE.
वैयक्तिक अभ्यासाबद्दलच्या व व्यक्तिमत्व विकास बद्दल प्रत्येक्ष किवा ऑनलाइन समुपदेशन घेण्यासाठी किवा अधिक माहिती साठी आपण मला माझ्या मोबाईल नंबर वर संपर्क करू शकता.

