उद्योजकता व कौशल्य विकास – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा ची योजना
ज्या प्रवर्गातील जाती करीता स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही अशा मध्ये उद्योजकता व कौशल्य विकास व्हावा या करीता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा ची योजना आहे.
ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्या अटी व शर्ती आहेत हे लाभार्ती पर्यंत पोहचवण्यासाठी दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता हॉटेल अभ्यंकर्स तंदुर,अग्रगामी हायस्कूल समोर, आर्वी रोड वर्धा. येथे कार्यशाळेचे आयोजन केले गेले.
या कार्यक्रमास नाचणगाव,पुलगाव, आंजी, धनोडी व वर्धा येथील 47 युवकांनी हजेरी लावली. श्री. सागर आंबेकर यांनी महामंडळाची व्याज परतावा योजना विस्तृत व समाधान कारकरित्या समजावून सांगीतली. CA श्रीकृष्ण अंबरकर यांनी प्रकल्प अहवाल या वस्तुनिष्ठ कसा असावा हे एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगीतली. बॅक ऑफ इंडिया चे AGM श्री. जितेंद्रकुमार मस्तमौला यांनी बॅंकेच्या कर्ज योजना समजावून सांगीतली व जे कर्ज प्रस्ताव येतील ते अत्यंत सुलभ व जलदगती ने मंजूर केले जातील असे आश्वस्त केले.बॅक ऑफ इंडिया चे श्री. सम्राट वर्मा यांनी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची अत्यंत समाधान कारक उत्तरे दिली. यावेळी मंचावर वर्धा नागरी बॅक चे शाखा व्यवस्थापक श्री. समीर गोविलकर तसेच कौशल्य विकास, उद्योजकता मार्गदर्शक श्री. रूपसिंग ठाकुर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन श्री. उध्दव भुसारी यांनी केले तर आभार श्री. भुषण अग्निहोत्री यांनी मानले.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्री. मधुकरराव जोशी, प्रफुल्लजी व्यास, सौ.मानसी केळकर, सौ.पारखी व सौ.कातरकर यांनी गुलाबपुष्पे देवून केले. कार्यशाळेच्या यशस्वीते करीता श्री. विवेकजी श्रौती, मंदार अभ्यंकर व सारंग आपटे यांनी विशेष परिश्रम घेतले.