संसार आणि समाज म्हणुन माझी जबाबदारी
मिशन सुर्योदय अंतर्गत आयोजित
“संसार आणि समाज म्हणुन माझी जबाबदारी” या विषयावरील वक्तृत्व स्पर्धा रविवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी अभ्यंकर्स तंदुर येथे उत्साहात पार पडली.
स्पर्धेचे प्रथम पारितोषिक सौ.मंजिरी अतुल रासपायले, द्वितीय सौ.अपुर्वा अमोल गाढवकर तर तृतीय सौ.पल्लवी स्वप्नील पांडे ह्यांनी पटकावले.
स्पर्धेची सुरवात परशुराम प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली.
स्पर्धा परीक्षण सौ.धनश्री बोरीकर पानसे व सौ.संध्या जोशी यांनी केले.
स्पर्धेनंतर लगेच
“आजची शिक्षण प्रणाली,वाढत्या अपेक्षां मुळे पालक आणि पाल्य यांच्यातील ढासळलेला समतोल”
यावर विषयावर चर्चा सत्र घेण्यात आले. चर्चा सत्रात सौ.अनघा आगवण, सौ.मंजिरी रासपायले, सौ.धनश्री बोरीकर व सौ.संध्या जोशी यांनी पालकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. सौ.आगवण यांनी नविन येवु घातलेल्या शैक्षणिक धोरण व अभ्यासक्रमा बद्दल माहिती दिली व मुलांची हुशारी फक्त शाळेत मिळालेल्या गुणांवरच आहे अशी समजुत पालकांनी करुनये तसेच ११ वी डमी ॲडमीशन च्या बळी पालकांनी पडु नये त्यात पाल्यांचे भविष्यात नुकसानच आहे असे सांगितलं.
कार्यक्रमाचे संचलन उध्दव भुसारी यांनी,प्रमुख पाहुण्यांची ओळख विवेक श्रौती यांनी तर आभार प्रदर्शन भुषण अग्नीहोत्री यांनी केले.पाहुण्यांचे स्वागत सौ.रुपाली अभ्यंकर, सौ.आरती श्रौती व सौ.रेणुका कतारकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
कार्यक्रम यशस्वीते करीता सारंग आपटे,प्रफुल्ल व्यास,मंदार अभ्यंकर यांनी विशेष परीश्रम घेतले.