जाणीव विकासासाठी शेती आधारित जीवनशैली – भाग ४

Date: June 20th, 2019 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Agriculture, Bhartiya Sanskriti, Business, Competition, General Knowledge, Geography, History, Wardha
जाणीव विकासासाठी शेती आधारित जीवनशैली – भाग ४

खरंच हे शक्य आहे का?
मी आतापर्यंत जे लिहले की शेतीतून अन्न स्वावलंबन आणि उद्योगातून आर्थिक स्वावलंबन च्या दिशेने उत्तम जीवन जगण्यासाठीचा आमचा प्रवास चालू आहे.
तर “खरंच हे शक्य आहे का?” असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. कारण सध्या आपण शेतीची परिस्थिती बघतो आहोत-पाऊस वेळेवर पडत नाहीये,पाण्याची पातळी खोल जात आहे,जंगली जनावरांचा पिकांना त्रास वाढला आहे, हवामान बदलाचे परिणाम शेतीवर होतं आहेत,पिकांना योग्य भाव नाही,जगण्याचे खर्च वाढत जात आहेत, शेतकऱ्यांना व त्यांच्या पुढील पिढीला शेती करावी वाटत नाहीये ई ई….
त्यामुळे शेती आधारित जीवन शक्य आहे का असा प्रश्न पडणे अत्यंत स्वाभाविक आहे.

आमच्या दृष्टीने त्याचे उत्तर हो आहे…
हो, आपण या पद्धतीने निश्चित जगू शकतो.
आपण खरे तर जगण्याचा फार विचार केलेलाच नाहीये. आपल्या काळात जशी जगण्याची पद्धती होती ती ग्राह्य धरुन आपण चालत आहोत. मध्येच कधीतरी आपण नेमके काय करत आहोत किंवा कशासाठी जगतोय असे प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतात. कधीकधी ताणही येतो, निराशा येते. पण जगण्याच्या रेट्यात, वेगात हे प्रश्न बाजूला पडतात. थोडा वेळ काढून या प्रश्नांवर विचार होत नाही. Weekend Outing करुन निराशेवर, ताणावर आपण मात करतो. पण ती तात्पुरती असते. असे प्रश्न पडत राहतात, साचत राहतात. ताण वाढवत राहतात.
त्यातून आजार ही होतात.
आपण नेमकं करतोय काय आणि जाणार कुठे आहोत, कुठे जायचे आहे ह्याचा फार काही विचार आपण करत नाही.
जगण्याचा हा विचार आम्ही केला आणि नंतर ही शेती आधारित जगण्याची दिशा निवडली…
आम्ही केलेल्या विचारांची पार्श्वभूमी व त्यावरील वाटचाल पुढील लेखातून मी आपल्या समोर ठेवतो..

आणि हो हा लेख लिहायला 3 दिवस उशीर झाला
त्याबद्दल क्षमस्व!

मंदार देशपांडे
9420415648
mandar9999@gmail.com


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik