About Us
जिल्ह्यात सर्वच ठिकाणी ब्राह्मण सभा वेगवेगळ्या क्षेत्रातून नेहमीच कार्यरत असतात. ब्राह्मणसभा असो वा युवा ब्राह्मण किंवा अजूनही बऱ्याच संस्था वर्धा जिल्ह्यातून समाजाच्या उत्थानाच्या प्रयत्नात असतात. पण, या सर्व संघटनांचे कार्य समाजबांधवा पर्यंत पोहचेलच असे नाही. या पुढे जिल्ह्यातील प्रत्येक घर व प्रत्येक व्यक्ती आता साखळीप्रमाणे एकमेकांशी बांधला जावा या करिता आम्ही काही ब्रह्मबंधूंनी सोबत येऊन ‘वर्धा ब्राह्मण, वर्धा’ ही वेबसाईट तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
वर्धा जिल्ह्यातील ब्रह्मवृदांचे कार्य आता जगापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला प्रयत्न सर्वांना रुचेल व यापुढे समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता आपले सहकार्य भविष्यात लाभत राहील ही अपेक्षा. ही कुठलीही वेगळी संस्था नसून जिल्ह्यातील वेगवेगळ्या
ब्रह्मवृदांसाठी कार्यरत असलेल्या सर्वच संस्थांचे कार्य एकाच व्यासपीठावर अपलोड करून त्याला विशालरूप देण्याचा व जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा प्रयत्न आहे.