घनपाठी कसे हाेता येते?
जेव्हा एखादी व्यक्ती रोज 12 तास या प्रमाणे सतत 12 वर्षे वेळ अध्ययनाला देते तेव्हा त्याला घनपाठी बनता येत.
घनपाठ पूर्ण करण्याचा क्रम असा आहे .
1) पदपाठ
2) क्रमपाठ
3) जटापाठ
4) घनपाठ
1) पदपाठ – संहितेत जे मंत्र आलेले आहेत ते वेगवेगळे करून म्हणणे म्हणजे पदपाठ होय.ऋग्वेदामध्ये 2-3-4 ओळींचे मिळून साधारणपणे 10500 मंत्र आहेत. या सगळ्या मंत्राना वेगवेगळं करून म्हणणे हा झाला पदपाठ.
उदा- सा रे ग म प ध नि सा
2) क्रमपाठ — वेगवेगळी असलेली पदे विशिष्ट क्रमाने म्हणणे म्हणजे क्रमपाठ होय. या मध्ये प्रत्येक पद 1-2-2-3-3-4-4-5 या क्रमाने म्हटले जाते. अभ्यासक्रम पूर्ण करायला साधरणपणे 2 वर्षे लागतात.
उदा- सारे ,रेग, गम, मप,पध ,धनि, निसा
3) जटापाठ -जर संहिता म्हणायला 15 मिनटं वेळ लागला तर जटापाठ म्हणायला 2 तास लागतो यामध्ये 1-2-2-1-1-2 असा क्रम झाल्यावर पहिले पद सोडुन दिले जाते मग 2-3-3-2-2-3 मग 2 रे पद सोडून दिले जाते या क्रमाने म्हटले जाते
उदा – सा-रे-रे-सा-सा-रे
4 ) घनपाठ- संहितेतील प्रत्येक पद 1-2-2-1-1-2-3-3-2-1-2-3 मग पहिले पद सोडून द्यावे मग 2-3-3-2-2-3-4-4-3-2-2-3-4या क्रमाने म्हणावे.जर
उदा- सा-रे-रे-सा-सा-रे-ग-ग-रे-सा-सा-ग-रे
हा वेळ आणी कष्ट फक्त मंत्र शिकण्यासीठी आहेत .. हे मंत्र कुठे वापरायचे .. कसे वापरायचे .. कुठल्या यज्ञात वापरायचे ह्याचे ज्ञान ग्रहण करण्याला लागणारा वेळ हा वेगळाच लागतो
आपल्याकडे एकंदरीतच पौरोहित्य या व्यवसायाकडे लग्नाच्या दृष्टिने दुय्यम दर्जा दिला जातो. पौरोहित्याच्या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न एखाद्या Engineer च्या पगाराइतके किंबहूना त्याहीपेक्षा जास्त असूनही अनेकदा या व्यवसायातील मुलांचा ब्राम्हण मुलीच विचार करत नाहीत. याबद्दल जरा वेगळा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आज कोणालाही विचारा नकारच कारण हेच की भटजी मुलगा नको तर नोकरदार मुलगा पाहिजे पण मी म्हणते की नोकरदारांपेक्षा जास्त कमाई ही पुरोहितांची असते.
स्वतःचं घर गाडी असते मग नकार का देतात कळत नाही आणी मुळात नोकरदारांपेक्षा जास्त भटजींच्या घरात सुखसोयी आहेत आज आपल्या समाजातील मुलींना समजावून सांगितले पाहिजे कि
1) पौरोहित्य करणारे पुरोहित कुटूंबास वेळ सहज देऊ शकतात,
2) पुरोहितांचे उत्पन्न भरपूर असते,
3) त्यांचे आचरण शुद्ध, सात्विक आणि समतोल असते,
4) पुरोहितांना समाजात मान असतो कारण ते संस्काराने परिपूर्ण असतात,
5) पुरोहितांच्या घरात मांगल्य, सुख , शांती जास्त असते कारण ते उपासना रोज करतात.
हे मुद्दे आपल्या समाजातील मुलींना सांगायला हवेत.
माझ्या मते, पौरोहित्य हि एक सेवा आहे. आदि कालापासुन यासाठी ब्राह्मणांना मान आहे. केवळ एखाद्या व्यवसायावरुन मुलीने नकार देणे अयोग्य आहे असे मला वाटते. पौरोहित्याबरोबर मिळणारे धार्मिक ज्ञान, वाचाशुध्दी व इतर संस्कार अमुल्य आहेत.
अमेरिकेत इंजिनिअर असुनही तिथे पौरोहित्यही करणारीही बरीच उदाहरणे आहेत. पौरोहित्य करण्याऱ्या मुलांनी आपल्या बहिणींना या क्षेत्राच महत्व पटवून दिले पाहिजे पण असं होत नाही मी पौरोहित्य करतो पण मला मुलगी मिळाली पाहिजे. पण माझी बहिण नोकरी करणाऱ्या मुलाच्या घरात गेली पाहिजे.
आज पौरोहित्य करणारीच मुले /आईवडील आपल्या मुलींना /बहिणींना पौरोहित्य करणाऱ्या घरात देऊ पाहत नाहीत हि आपल्या समाजातील वस्तूस्थिती आहे. आणि हेच चित्र बदलले पाहिजे यावर सर्वांनी मिळून उपाय शोधण्याची आज गरज निर्माण झाली आहे .
