व्यवसायात रिस्क घेतली तर रिटर्न मिळतातच

Date: February 6th, 2019 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Home Slider, Latest News
व्यवसायात रिस्क घेतली तर रिटर्न मिळतातच

*ब्राह्मण युवकांना अंबर अरोदकरचे ट्रॉनिक कोणतेही काम सोपे नसल्याचे सांगून मोठे लोकं ममता दाखवतात. परिणामी, आपण मागे राहून जातो. मोठे कामं अबघड असले तरी कोणाची वाट न पाहता कामाला लागा. एकदा अपयश येईल. त्यातून तुम्हाला शिकायला मिळेल. तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकाल. व्यवसायात रिक्स आणि रिटर्न या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाला बोलवले तर दुसराही हजर असतो. रिक्स घेतल्यानेच रिटर्न मिळते. हिमतीने पुढे गेल्यास यश मिळतेच, असे मार्गदर्शन इंदोर येथील प्रसिद्ध बक्ता अंबर आरोंदेकर यांनी केले. स्थानिक हॉटेल तंदूर येथे शहरातील ब्राह्मण युवकांना व्यवसायातील संधी, व्यवसाय आणि व्यक्तिमत्त्व विकासावर आयोजित पहिल्या एक दिवसीय कार्यक्रमात ते बोलत होते. देश विदेशात आपल्या वक्तव्याने भुरळ पाडून युवकांना आपलेसे वाटणारे अरोंदेकर पुढे म्हणाले, लेक्चर तसे कुणालाच आवडत नाहीं.

शाळा महाविद्यालयापर्यंतची गोष्ट निराळी असते. त्या क्षेत्रातून बाहेर निघाल्यानंतर प्रत्येकाला आपला पायावर उभे होण्याची इच्छा असते. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जबाबदारी पार पाडण्यासाठी दुस-या व्यक्तींच्या मार्गदर्शनाची मुळात गरजच काय असा प्रश्न त्यांनी सुरुवातीला उपस्थित केला. जबाबदारी । निबण्याची शक्ती आपल्याला रियॉक्ट करते. दुस-याचे मार्गदर्शन ब-याचदा ‘उधार का सिंदूर असल्याचे सांगून जे करायचे आहे ते स्वत:च्या बळावर करा, असे ते म्हणाले. मोठं काम करायचे तर ते अवघड असणारच. आपल्या पेक्षा मोठे असणारे प्रेमापोटी अबघड काम करू देत नाहीत, त्यामुळे मग आपण मागे पडून जातो. यशाची परिभाषा सांगताना यश म्हणजे नेमके काय असा प्रश्न विचारून यश म्हणजे पैसा समजला जातो. पण, पैसा म्हणजेच यश होऊ शकत नाही. माझ्याकडे पैसा असता तर मी हे केले असते असा ९९ टक्के मध्यमवर्गीयांचा एक ग्रह झालेला असतो. उद्योजकाने आयडीयाची वाट बघायची नसते. व्यवसाय करण्याचा विचार मनात आल्यानंतर सर्व भीतीं सोडून द्यायची असते. प्रयत्न केल्याचे समाधान मिळते.

अपयश आले तर लोक हसतील, पण, त्यात बाईट बाटून घेऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला. आजही चांगले बेतन कमावणारे ९० टक्के नोकरदार आपल्या नोकरीवर खुष नाहीत. परंतु, ते नोकरी सोडायला का घाबरतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नोकरीतील सुरक्षा हा महत्त्वाचा आजार जडलेला असतो. नोकरीत ४ बर्षे कसे निघून ज्ञातात ते कळत नाहींत. आपल्याला २९ हजार २२० दिवस जगायचे आहे.

आपल्या अपेक्षा वाढत जातात. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. प्रत्येकाने महत्त्वाकांक्षी असले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. व्यवसाय करताना रिक्स नको असते आणि रिटर्न मात्र हवे असते. रिक्स घेतल्याशिवाय व्यक्ती मोठा होत नसल्याचे ते म्हणाले. रिक्स न घेता प्रत्येकाला बदल हवा असतो. त्यातच व्यवसाय माघारला जातो. चांगल्या अभ्यासाने चांगली नोकरी मिळते. परंतु, सीआर आपल्या हाती नसते. माझ्या आयुष्याचा ‘सीआर’ आपल्याच हाती असला पाहिजे. जीवनाच्या पुलावरून उडी मारा. आयुष्यात सर्वच मार्ग एकाच वेळी मोकळे होत नसतात.

आपल्या सुरक्षित जागेतून बाहेर या, असे आवाहन त्यांनी केले. आम्ही स्वभाव घेऊन जन्माला आलो असतो. त्या परिस्थितीनुसार बदल करावा लागतो. स्वतः ठरवले तर आपले जीवन आपण बदलवू शकतो. कोरलेल्या दगड़ात प्राणप्रतिष्ठापणा केल्यानंतर देवत्व येऊ कशते तर आपण आपल्यात बदलहीं करू शकतो. स्वत:च्या ध्येयात प्राणप्रतिष्ठापना करा, असे त्यांनी उदाहरणातून पटवून दिले. १० पैकी १ लोकं नाही म्हणतील पण २ लोक तुमच्या सोबत असतील तेच तुमचे यश समज्ञा. भाग्याच्या जोरावर नव्हे आणि तासाची वाट बघू नका, जीवन जगण्याचा विचार करा, असेही अरोंदेकर यांनी पटवून दिले. अंबर अरोंदेकर यांचा सन्मानचिन्ह देऊन विवेक श्रोती यांनी सन्मान केला. संचालन निरज्ञ शिंगोटे यांनी केले.

प्रास्ताविक व परिचय राहुल सराफ यांनी केले. आभार प्रफुल्ल व्यास यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. किरण खेर, नरेंद्र खरे, विजय देशपांडे, बुलढाणा अर्बनचे विभागीय व्यवस्थापक विनय राजे, श्रीनिवास लेले, आदींसह शहरातील युवा उद्योजक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी मंदार अभ्यंकर, मंगेश परसोड़कर, शैलेश डेहाङराय, सारंग आपटे आदींनी परिश्रम घेतले.

श्री. अंबर आरोंदेकर
Co-founder at The Impact Learning.
Business Consultant and Corporate Trainer
Indore, Madhya Pradesh, India


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik