मिशन सुर्योदय अंतर्गत आयोजित मगनसंग्रहालय सहल दि १० सप्टेंबर १९ रोजी.
आज मिशन सुर्योदय अंतर्गत ७ ते १४ वयोगटातील बालगोपाळांसाठी मगनवाडी सहलींचे आयोजन करण्यात आले या वेळी ४३ मुल सहभागी होते.मनिषादिदी यांच्या मार्गदर्शनात संग्रहालय, खादी विभागातील सुतकताई,हातमागाद्वारे खादीची निर्मीती व रंगाई काम मुलांना प्रत्यक्ष दाखवण्यात आले. श्री. राममोहन बैंदुर यांनी मुलांना बोधपुर्ण गोष्ट सांगुन आजोबांची भुमीका पारपाडली. मामाचपत्र हारवल,आईंना माईन फुल दे,खुपसणी आदि पारंपारीक खेळांचा मुलांनी मनमुराद आनंद लुटला.सहभोजना पुर्वी श्री. अनिल मानकीकर यांनी मुलांकडून विविध श्लोक म्हणुन घेतले.
या वेळी सौ. आरती श्रौती,सौ.धनश्री बाराहाते, सौ.रेणुका डेहाडराय,सौ. किर्ती आपटे यांनी मुलांची विशेष काळजी घेतली.सहल यशस्वी करण्या करीता मनोज सहस्त्रबुध्दे, वैभव भुसारी, सारंग आपटे,राहुल सराफ,भुषण अग्निहोत्री,उध्दव भुसारी,धनंजय बाराहाते,शैलेश डेहाडराय,मंगेश परसोडकर,मंदार अभ्यंकर,प्रफुल व्यास,विवेक श्रौती,मनोज पारखी यांनी विशेष प्रयत्न केले.
समाजातील मुलांमधे एकोप्याची भावना वाढावी या दृष्टीने दर महीन्यात एकदा मुलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्या अंतर्गत आॅक्टोबर महीन्यात मुलांना बजाज सायंस सेंटर दाखवल जाणार आहे.