अभ्यासाची गुरुकिल्ली भाग: २

Date: January 22nd, 2021 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Latest News
अभ्यासाची गुरुकिल्ली भाग: २

प्रिय,पालक व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नमस्कार.

अभ्यासाची गुरुकिल्ली या लेखन मालिकेतील पहिल्या लेखात आपण या विषयाची प्रास्ताविक समजून घेतले होते आज या दुसर्या लेखातआपण एकाग्रता आणि ध्यानधारणा या विषयावर माहिती करून घेऊ.

एकाग्रता: बरेचदा विद्यार्थी शिक्षक शिकवत असताना दुर्लक्ष करतात आणि मग तो भाग त्यांना समजत नाही.

शास्त्रीयरीत्या हे सिद्ध झाले आहे कि जर आपण वर्गात अथवा कोचिंग क्लासेस मध्ये एकाग्रतेने लक्षपूर्वक ऐकेले तर ३०% अभ्यास तिथेच पूर्ण होतो.
एकाग्रता भंग होण्याचे कारण आंतरिक व बाह्य अशे दोन प्रकार.बाहेरून येणारे आवाज,भूक लागणे,झोप पुरेशी न होणे इत्यादी अशी काही करणे एकाग्र न होणे मागची करणे आहेत व ती प्रयत्नपूर्वक टाळता येतात.ओमकार जप रोज ११ वेळेस सकाळ संध्याकाळ केल्यास मन शांत होते आणि अभ्यासात एकाग्र होण्यास मदत होते.

ध्यानधारणा हा शब्द ऐकायला जरी कठीण वाटला तरी क्रिया हिसोप्पी आहे.यात मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे

पहिला उपाय म्हणजे देवा जवळ दिवा लावून ५ मीन ज्योतीकडे एकाग्र होऊन बघावे.

दुसरा उपाय म्हणजे एका कागदावर एककेंद्री दोन वर्तुळ काढावी व एकाला पिवळा व एकाला केशरी रंग देऊन हे आकृती अभ्यासाच्या खोलीत लावावी व रोज ५ मिनिटे एकाग्र होऊन पाहवी या मुले मनाची चंचलता नाहीशी होऊन अभ्यास करताना एकाग्रतेने अभ्यास होऊन तो स्मरणात राहील. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे दोन्ही उपाय नियमित रित्या केलायस याचा नक्की तुम्हाला फायदा होईल यात शंका नाही.

काळजी घ्या अभ्यास करा व आनंदी राहा आणि ऑल द बेस्ट..!!

वैयक्तिक अभ्यासाबद्दलच्या प्रत्येक्ष किवा ऑनलाइन समुपदेशन घेण्यासाठी किवा अधिक माहिती साठी आपण मला माझ्या मोबाईल नंबर वर संपर्क करू शकता.

क्रमक्ष:

सौ संध्या उपेंद्र जोशी
वरिष्ठ समुपदेशक
मो: +९१ ९४२२२९६०९४


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik