संत ज्ञानेश्वर
जन्म : १२७५
मृत्यू :१२९६
हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. त्यांच्या थोरल्या भावाचे नाव निवृत्तीनाथ तर धाकट्या भावंडांची नावे सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी होती. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक योगी व तत्त्वज्ञ कवी. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभाव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ही त्यांची काव्यरचना. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तुत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील लोकांना आध्यात्मिक लोकशाहीची प्रेरणा मिळाली. संत ज्ञानेश्वरांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळील आपेगांव येथे झाला.भावार्थदीपिका हे भाषांतराचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.
संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली. संत नामदेवांच्या जोडीने त्यांनी भागवत धर्म – वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. ७०० वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचे अनुयायी महाराष्ट्रात आजही लाखो संख्येने आहेत.
आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर गुरूच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांनी देहांत प्रायश्र्चित घेतले.
निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने – ६.१४)असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते. त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब‘ह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.
‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्र्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय.यात अद्वैताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे.
‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह – या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.
‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह – या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.
ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ
भावार्थदीपिका – ज्ञानेश्वरी- या ग्रंथाचा शेवट पसायदान या नावाने ओळखला जातो. स्पुटकाव्य (उदा.अभंग, विराणी, चागदेव पासष्टी, आदि.) ज्ञानेश्वर हरिपाठ अमृतानुभव
संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा मराठी संस्कृतीवर असलेला प्रभाव आजही अबाधित आहे. संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या २१ व्या वर्षी इ.स. १२९६ त्यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.
Recent Post
-
अथर्वशिर्ष स्पर्धा – 2023
मिशन सुर्योदय द्वारा आयोजित अथर्वशिर्ष स्पर्धा आज उत्साहात पार पडली. सर्धेतील अ गटाचे प्रथम परीतोषिक कु.जिविका भुसारी तर द्वितीय अवनिश गाढवकर याने पटकावले. ब गटात प्रथम चि.अनय पंडीत द्वितीय कु.स्वराली गाढवकर तृतीय चि.मिहीर केळकर यांनी बक्षिसे पटकावली. कार्यक्रमाची सुरवात गणेश पुजनाने झाली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणुन लाभलेले श्री.संजिवजी लाभे सर यांचे स्वागत निरज शिंगोटे यांनी उपरण […]
-
संसार आणि समाज म्हणुन माझी जबाबदारी
मिशन सुर्योदय अंतर्गत आयोजित “संसार आणि समाज म्हणुन माझी जबाबदारी” या विषयावरील वक्तृत्व स्पर्धा रविवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी अभ्यंकर्स तंदुर येथे उत्साहात पार पडली. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक सौ.मंजिरी अतुल रासपायले, द्वितीय सौ.अपुर्वा अमोल गाढवकर तर तृतीय सौ.पल्लवी स्वप्नील पांडे ह्यांनी पटकावले. स्पर्धेची सुरवात परशुराम प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली. स्पर्धा परीक्षण सौ.धनश्री बोरीकर […]
-
संभाषण कला शिबीर
मिशन सुर्योदय द्वारा आयोजित संभाषण कला शिबीर उत्साहात संपन्न.एकुण १६ जणांनी सहभाग नोंदवला. श्री.प्रसाद फडणवीस व सौ.गौरी शास्त्री देशपांडे यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलं .कार्यक्रमाचा समारोप निबंध स्पर्धेच्या बक्षिस वितरणाने झाला.स्पर्धेचे प्रथम परीतोषिक श्रीमती.सरीता आगवण द्वितीय सौ.कविता जवदंड तर तृतीय सौ.पल्लवी पांडे यांनी पटकावले.कार्यक्रमाचे संचलन उद्धव भुसारी तर आभार प्रफुल्ल व्यास यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी […]
-
उद्योजकता व कौशल्य विकास – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा ची योजना
ज्या प्रवर्गातील जाती करीता स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही अशा मध्ये उद्योजकता व कौशल्य विकास व्हावा या करीता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा ची योजना आहे. ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्या अटी व शर्ती आहेत हे लाभार्ती पर्यंत पोहचवण्यासाठी दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता हॉटेल अभ्यंकर्स […]
Blog Archive
