म्यूच्यूअल फंडमधे गुंतवणूक का करावी ?
Date: January 28th, 2019 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Latest News, Share Market
म्यूच्यूअल फंड ( MF ), शेयर मार्केट बद्दल मराठी माणुस नेहमीच उदासीन असतो किंवा त्याकड़े अतिशय संशयाने बघतो. त्याच्या मते MF, इक्विटी मधील गुंतवणूक हा निव्वळ जुगार आहे किंवा नशीबावर अवलंबून आहे. पण ह्यांच्या अगदी उलट परिस्थिती गुजराती, मारवाड़ी किंवा हिंदी भाषिक व्यावसायिक समाजाची आहे. याला कारण हे कि व्यवसायामुळे त्याना उद्योग, धंदा, विविध सेक्टर्स ची माहिती असते. व्यवसायामधील तेजी / मंदी त्यानी बघितली असते, व्यवसायात येणारे चढ़ उतार त्यांना नवीन नसतात.
या देशातील प्रत्येक सेक्टर मधील मोठ्यात मोठी व लहानात लहान कंपनी पण शेयर मार्केट मधे लिस्टेड आहे.
उदहरणार्थ
IT सेक्टर च्या इंफोसिस, TCS, विप्रो, HCL Tech, टेक महिंद्रा
बैंक – SBI, HDFC बैंक, Icici बैंक, कोटक बैंक,
हाउसिंग फाइनेंस कंपनी – HDFC, Lic हाउसिंग, DHFL
ऑटो / कार कंपनी – मारुती, Ashok leyland, Eicher मोटर, Tata मोटर, महिंद्रा एंड महिंद्रा.
औषधी कंपनी – sun pharma, cipla, Dr.Reddys, cadila, Glenmark, Aurobindo, Divis.
Bata, Titan, अमृतांजन, डाबर, ITC, ब्रिटानिया, नेस्ले, हिन्दुस्तान लिवर, मैरिको, हैवेल्स, PVR सिनेमा, या सारख्या असंख्य कम्पनीज चे लोकप्रिय प्रोडक्ट आपण रोज सकाळ पासून रात्री पर्यन्त रोज वापरत असतो आणि या कम्पनीज चा Turnover आणि प्रॉफिट देखील वाढवत असतो पण याच कम्पनीज मधे आपण गुंतवणूक का करत नाही ??? त्याच्या व्यवसायामधे भागीदार का होत नाही ?
तुम्ही म्हणाल इतका अभ्यास करायला, कम्पनीज शोधयला वेळ नाही आणि स्किल पण नाही. म्हणूनच नवीन, लहान आणि मार्केट ची माहिती नसलेल्या गुंतवणुकदरांनी म्यूच्यूअल फंडचा मार्ग निवडावा.
D’mat एकाउंट उघडून काहीही बेसिक माहिती नसताना डायरेक्ट शेयर्स घेणे हे फार जोखिमपूर्ण आहे आणि तुमच्या पैश्याचा व वेळेचा अपव्यय होणार हे नक्की.
म्यूच्यूअल फंड मधे 15 – 20 वर्षाचा अनुभव असलेले फण्ड मैनेजर आणि त्यांची रिसर्च टीम तुमच्या साठी सतत काम करत असते. तुमच्या गुंतवणूक केलेल्या पैश्याची विविध सेक्टर्स मधे विविध कम्पनीज मधे अभ्यासपूर्ण पद्धतीने इंवेस्टमेंट करीत असतात. वेळच्या वेळी प्रॉफिट बुक देखील करतात.
गुंतवणूकीमधे किमान Inflation rate ( महागाई दर) पेक्षा जास्त परतावा यायला हवा.
मागील 25 – 30 वर्षात विविध asset classes जसे सोन, बैंक FD, प्रॉपर्टी आणि इक्विटी म्यूच्यूअल फंड चा अभ्यास केला तर असे दिसते की इक्विटी म्यूच्यूअल फंड ने सर्वात जास्त परतावा दिला आहे तो देखील Taxfree.
SIP च्या द्वारे म्यूच्यूअल फंड मधे गुंतवणूक हा सर्वोत्तम पर्याय आहे. Sip ची गुंतवणूक मार्केट मधील चढ़ उतार व गुंतवणूकी संबंधित आपले भावनिक चढ़ उतार या दोन्ही साठि चांगला उपाय आहे.
लांब अवधी साठि जसे 10- 15- 25 वर्षा करता sip द्वारे नियमित गुंतवणूक करत राहील्यास compouding Effect मुळे तुम्ही मोठया संपत्तिचे सृजन करु शकता.
आज भारतीय अर्थव्यवस्था GDP Growth मधे चीन ला मागे टाकून जगात नंबर एक वर आहे. ही इकॉनोमिक ग्रोथ किमान पुढची 15 ते 20 वर्ष टिकून राहणार आहे. भारतामधे विकासा साठि प्रचंड संधी आहेत. त्यामुळे म्यूच्यूअल फंड मधे गुंतवणूक करून या भारताच्या उत्कर्षाचे, समृद्धीचे भागीदार व्हा, या संधीच सोन करा…..
Happy Investing…
निशिकांत रोटकर
बालाजी इंवेस्टमेंट्स
वर्धा.
9890090611
