नाशिकच्या विजयानंद थेटरमध्ये ‘संगीत शारदा’चा नाट्यप्रयोग चालू होता.
श्री अनंत लक्ष्मण काणेरे
1891 ला जन्म आणि 1910 ला फाशी 19 वर्ष वयात कामगिरी करून निघून गेले.
नाशिकच्या विजयानंद थेटरमध्ये ‘संगीत शारदा’चा नाट्यप्रयोग चालू होता.. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन त्या खेळाला येणार होता…ती संधी साधून अनंत कान्हेरे हा १७ वर्षांचा तरुण आपल्या कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे या सहकाऱ्यांसोबत तिथे टपून बसला होता…जॅक्सन येताच त्याने गोळी झाडली… तो पळू लागताच पाठून धावत जाऊन त्याला टिपले…पुढे नेहमीच्या फितुरीमुळे हे क्रांतिवीर पकडले गेले…त्यांना वर्ष १९१० मध्ये आजच्याच दिवशी ठाण्याच्या कारागृहात फाशी देण्यात आले…ते तरुण फाशी गेल्यावरही ही केस केवळ सावरकरांना अडकवण्यासाठी चालू ठेवण्यात आली…त्यांनी पाठवलेल्या २० ब्राउनिंग पिस्तुलापैकी एक पिस्तुल यात वापरण्यात आले होते असा सरकारचा आरोप होता…..
सशस्त्र क्रांतिकारकांच्या कुटुंबाची त्यांच्यानंतर खूप ससेहोलपट झाली…भित्रा समाज पोलिसी चौकशी नको म्हणून मदतही करत नसे…कान्हेऱ्यांचा भाऊ मुंबईच्या गोदित कोळसे उचलण्याचे काम करून पोट भरू लागला…पुढे लोकमान्यांनी त्याला मदत केली…विनायकराव देशपांडेंची पत्नी दादरला एका घरात पोळ्या करायला जात असे…या माऊलीच्या नवऱ्याने देशासाठी आपले प्राण दिले हे त्या घरच्या लोकांनाही ठाऊक नव्हते….
स्वराज्य मिळाल्यानंतरही परिस्थिती बदलली नाही…अहिंसक आंदोलकच देशभक्तीची प्रमाणपत्रे मिळवून पेन्शन आणि अन्य लाभार्थी झाले..थोरल्या चापेकरांची पत्नी १९५७ पर्यंत जिवंत होती….अखेरच्या काळात कै.वि.श्री.जोशी यांच्या प्रयत्नामुळे त्यांना पेन्शन चालू झाले…
आपण किमान या क्रांतिवीरांना विसरता कामा नये…..!!
कोटी कोटी प्रणाम…..!!!
