“रांगोळी” भारतीय संस्कृतीचे एक अविभाज्य अंग

Date: April 23rd, 2019 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Bhartiya Sanskriti, Competition, Education, General Knowledge, Geography, History
“रांगोळी” भारतीय संस्कृतीचे एक अविभाज्य अंग

लेखिका: आरती श्रौती

आपल्या संस्कृतीत छोट्या छोट्या गोष्टीना खूप महत्त्व दिले गेले आहे. जसे रोज अंगण झाडून सडा टाकणं, तुळशी समोर दिवा लावणे , देवा जवळील रांगोळी , समईतील दिवा . जसे उदबत्ती लावून त्याचा सुगंध घरभर पसरला की आपलं मन , घर अंगण सगळं काही प्रफुल्लित होऊन जाते ,तसेच रांगोळी चे आहे.

जर मन प्रफुल्लित असेल तर positive energy चे वातावरणात बनते. रांगोळी काढताना आपल्याला विविध देव देवतांचे प्रतिकात्मक चिन्हें ,आडव्या उभ्या रेषा, वर्तुळ, चौकोण, त्रिकोण, यांच्या सहाय्याने  सुबक रांगोळीळी तयार होते.तसेच निसर्गातील वेली , फुल, पानं, यांचा वापर करून ही  रांगोळी आकर्षक केली जाते.

त्याच प्रमाणे तांदळाच्या पिठाची रांगोळी , खडु ने  काढलेली रांगोळी  असे विविध प्रांतात विविध चित्राकृतींनी अलंकारित केली जाते.अशा या रांगोळी ला भारतीय संस्कृतीत धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्व आहे.

रांगोळी काढताना :

  1. रेष अगदी बारीक आणि रेखिव असली पाहिजे.
  2. रांगोळीत रंग भरतांना एकदम सगळेच रंग वापरू नये.
  3. दोन ते तीन रंग घेऊन त्यातील विविध छटा तयार करून (light to dark shades) रांगोळी
    काढावी.
  4. जर एखादा फिक्कट(light) रंग घेतला तर त्याच्या बाजूला गडद(dark)रंग  घ्यावा , एकदम
    भडक(bright) रंग वापरु नये.
  5. रंग भरताना ते बाहेर न जाऊ देता काटेकोर पणे भरावे.
  6.  

खाली रोज दारा समोर काढण्यासाठी रांगोळी चे प्रकार देत आहे, आपल्याला उपयोगी पडतील.


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik