Financial planning करताना सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तुमचे आयुष्यातील Goals ठरवणे.
Date: April 26th, 2019 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Business, Business Management, Mutual Fund, Share Market
मागील लेखां मधे आपण म्यूच्यूअल फंड मधे का गुंतवणूक करावी आणि म्यूच्यूअल फंड चे विविध फायदे या बद्दल माहिती करून घेतली. तसेच म्यूच्यूअल फंड बाकी Financial Products पेक्षा कसे लवचिक, सोपे आणि tax efficient आहे हे ही बघितले.
आपण सर्व आपल्या कुटुंबियाच्या गरजा पूर्ण करण्या करता प्रचंड मेहनत करत असतो. त्या पैश्यातुनच आपली आजची गरज व भविष्यात लागणारा पैसा जसे रिटायरमेंट साठि, मुलांच्या शिक्षणा व लग्ना करता, घर बांधन्या करता या सर्वाच प्लानिंग कराव लागत.
Financial planning करताना सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तुमचे आयुष्यातील Goals ठरवणे. विविध कारणा करता आयुष्यातील कुठल्या टप्प्यात / वयात किती पैसा लागणा र हे ठरवणे. तसेच जो काही पैसा भविष्यात लागणार आहे त्याची Inflation Adjusted म्हणजे वाढत्या महागाई चा विचार करून value काढणे. भारता सारख्या high growth असलेल्या देशात महागाई चा दर हा पण जास्तच असणार. किमान 4% ते 7%. मागिल 10 – 15 वर्षात शिक्षण आणि वैद्य किय उपचार याचा खर्च कितीतरी पटीने वाढला आहे. 15 वर्षापूर्वी इंजीनियरिंग ला जितकी फी लागायची त्या पेक्षा जास्त फी आता नर्सरी / प्राइमरी ला लागते. त्यामुळे महागाईचा दर लक्षात घेऊनच भविष्यचे प्लानिंग करावे. नाही तर सम्पूर्ण प्लानिंग चूकेल.
एकदा goal आणि त्याची value ठरली की दूसरी स्टेप म्हणजे आपल्या goals ला शार्ट टर्म goal आणि long term goal मधे विभाजीत करणे.
1 ते 3 वर्षा पर्यन्त चे Goals हे शार्ट टर्म व 5 वर्षाहुंन अधिक म्हणजे long टर्म goal.
जे goals 1-3 वर्षात येणार आहेत त्या साठि फिक्स डिपॉजिट, Debt म्यूच्यूअल फण्ड, लिक्विड फण्ड, क्रेडिट रिस्क फंड, कॉर्पोरेट बॉन्ड फंड या सारख्या सुरक्षित आणि गारंटीड परतावा देणाऱ्या फंड्स मधे गुंतवणुक करावी. 100% इक्विटी म्यूच्यूअल फण्ड टालावेत. कारण छोट्या अवधी मधे स्टॉक मार्केट अनिश्चित असतात.
Long term goal म्हणजे 5 वर्ष हुन अधिक या साठि Diversified इक्विटी फण्ड, लार्जकैप किंवा multicap फण्ड मधे गुंतवणूक करावी. मिडकैप आणि स्माल कैप फंड्स मधे रिटर्न्स भरपूर असतात पण जोखिम पण तेवढीच असते. त्या मुळे मिडकैप आणि स्मॉलकैप फंड्स मधे एकूण पोर्टफोलियो च्या 30 ते 40 टक्यापेक्षा जास्त गुंतवणूक करु नये.
तुमच्या जोखिम (Risk) घेण्याच्या क्षमतेनुसार म्यूच्यूअल फंड पोर्टफोलियो बनवता येतो. ज्याना जास्त जोखिम घ्यावयाची आहे त्याच्या साठि अग्रेस्सिव पोर्टफोलियो आणि ज्याना कमी जोखिम आणि कमी उतार चढ़ाव हवे आहेत त्याच्या साठी आपल्या गरजेनुसार conservative पोर्टफोलियो देखील बनवता येतो.
Thanks & Regards,
Nishikant Rotkar
Balaji Investment Services,
Near Sai Mandir, Wardha – 442001
| Mutual Funds | Fixed Deposits | Life Insurance | Financial Planning |
Our Wealth Management Portal : www.my-eoffice.com
nishi_rotkar@rediffmail.com | Mob. 9890090611
