भगवान श्री परशुराम

Date: May 7th, 2019 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Bhartiya Sanskriti, History, Politics, Wardha
भगवान श्री परशुराम

लेखिका: रेणुका शिंगोटे
Propritor Hindavi ladies Fashion
साई नगर , वर्धा

परशुराम जयंती च्या हार्दिक शुभेच्छा

सप्तचिरंजीवी मधील एक श्री परशुराम यांचा जन्म वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेला ऋषी जमदग्नी व रेणुका माता यांच्या पोटी झाला.उंच बांधा, जटाधारी विजया नामक धनुष्यधारी व हातात परशु अशी परशुरामाची मुर्ती असते. ते भार्गववंशी अयाचक बाह्मण आहेत.विष्णु चे सहावे अवतार भगवान परशुराम शिव उपासक होते. त्यानी तपस्या करून परशु प्राप्त केला व अनेक विद्या आत्मसात केली. अनेक शिष्य त्यांनी घडवले. महाभारत कालीन भीष्म, गुरू द्रोण व कर्ण त्यांचे मुख्य शिष्य होते.

अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सरारं धनु |
इदं ब्राह्मम इदं क्षात्र शापादपि शरादपि ||

अर्थात चार वेद मुखात आहे, पाठीवर घनुष्य बाण, बाह्मण व क्षात्रिय दोन्ही गुण असल्याने शाप आणि शस्त्र दोन्ही गोष्टींचा जो उपयोग करतो तो परशुराम.

प्रचलित आहे कि कोंकण प्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र ४०० योजन मागे हटवून केली आहे, म्हणून परशुरामाला कोंकणाचा देव म्हणतात.कोकण ,केरळ आणि विविध भागात क्षेत्रे आहेत. दक्षिण भारतात परशुरामाची जयंती थाटात साजरी केली जाते, इतरत्र पण शोभायात्रा व उत्सव करून लोक जयंती साजरी करतात.

भगवान परशुराम ची पुजा कशी करावी

अक्षयतृतीयेला त्यांची पंचोपचार, षोडषोपचार किंवा मानसिक पुजा करावी यांनी अक्षय पुण्य प्राप्त होते, कमीत कमी अध्य अवश्य द्यावा. फोटो नसेल तरी श्रीविष्णु च्या समोर ताम्र कलशा मध्ये पाण्यात रवेत. चंदन, श्वेत पुष्प व अक्षत टाकुन ताम्हणात निम्न मंत्र म्हणून अर्ध्य द्यावा.

ॐ जमदग्निसुतोवीर क्षत्रियान्तकर प्रभो
गृहाणधरय मया दत्त कृपया परमेश्र्वर||

जय परशुराम


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik