जाणीव विकासासाठी शेती आधारित जीवनशैली – भाग ३

Date: June 3rd, 2019 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Agriculture, Bhartiya Sanskriti, Business, Business Management, Education, General Knowledge, Geography
जाणीव विकासासाठी शेती आधारित जीवनशैली – भाग ३

उद्योग….

उद्योग हा कोणत्याही जीवनशैलीचा महत्वाचा भाग आहे. शेती आधारित जीवनशैलीचा खास करुन. कारण फक्त शेती ही एका टप्प्याच्या पलीकडे तुम्हाला नेऊ शकत नाही. नाहीतर मग तुम्ही मालगुजर असले पाहिजे.. पण आपल्याकडे छोटे शेतकरीच जास्त आहेत. त्यात कोरडवाहू शेतकऱ्यांची संख्या ही जवळपास 60 ते 70% आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामाचेच पीक व्यवस्थित होते. ते पण पावसावर अवलंबून असल्याने कमी-जास्त होत राहते. म्हणून त्याला जोडधंदा असणे आवश्यक आहे. उद्योगामध्ये तुम्ही तयार केलेला माल असल्याने तुम्ही त्याची किंमत ठरवू शकता. उत्तम माल बनवणे नि चांगली किंमत घेणे तुमच्या हातात आहे.

व्यवसाय बरेच आहेत. आपल्या परिसरात, वातावरणात होणाऱ्या गोष्टींपासून उद्योग करण्याचा विचार जास्त योग्य ठरतो. यात कच्चा माल आपल्या हातात राहतो.
तर अशा सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही उद्योग करायचे ठरवले. मागच्या लेखात लिहल्या प्रमाणे शेतीतून स्वावलंबन आणि उद्योगातून आर्थिक स्वावलंबन.

उद्योगा मध्ये आम्ही खालील गोष्टी बनवतो
◆तुर व चणा यांची सिंगल फेज मशीनवर बनवलेली डाळ. पारंपरिक पद्धतीने डाळ बनवतो म्हणजे तूर/चणा भिजत घालणे, मग पाणी काढून सुती पोत्यात काही काळ भरुन ठेवणे, मग उन्हात 2 दिवस खणखणीत वाळवणे. त्यानंतर घरी असणाऱ्या सिंगल फेज जात्याच्या मशीनवर या तूर/चणा ची डाळ करणे. नंतर त्याला तेलपाणी करुन एक रात्र दडपून ठेऊन, नंतर एक ऊन देऊन परत या मशीनवर डाळ करणे. यात वापरले जाणारे तेल हे गोपुरीतील शुद्ध तेल असते. या मशीन चा स्पीड कमी असल्याने डाळीचे तापमान वाढत नाही. ही डाळ म्हणून खाण्यासाठी उत्तम असते. जात्यावरची डाळ त्यापेक्षा ही उत्तम.
मी फक्त माझ्या शेतातील तूर व चणा यांचीच डाळ बनवतो.

◆शेतात इतर जास्त होणाऱ्या गोष्टीही विकतो.
जसे की
गावरान धने,
बारीक मोहरी,
हळद(वायगाव),
बन्सी गहू- ज्यात इतर गव्हाच्या दुप्पट म्हणजे 18% प्रोटीन असते, पोळी मस्त नरम होते.

◆लाल आंबाडीचे प्रॉडक्टस-
लाल आंबाडीच्या पानांची भाजी आपण खात असतो. बाजारात येणाऱ्या लाल पाकळ्यांची चटणी ही आपण खातो.
याच लाल पाकळ्यांपासून आम्ही तीन प्रॉडक्ट्स बनवतो.
1.लाल आंबाडी जॅम-ताज्या फुलांच्या पाकळ्या पासून हा जॅम बनवतो. ब्रेड वा पोळीला लावून खाण्यासाठी उत्तम.
2.लाल आंबाडी पाचन गोळी- वाळवलेल्या फुलांच्या पावडर पासून ही पाचक गोळी बनवतो. यात जिरे, मिरे, काळ मीठ, सैंधव इत्यादी पाचक गोष्टी आहेत. मुखवास म्हणून ही उत्तम.
3.लाल आंबाडी सरबत पावडर- लाल आंबाडी सरबत वर्धेकरांच्या चांगलेच परिचयाचे आहे.
आम्ही सरबताची पावडर बनवतो-Ready to Use.
एका 200 ml ग्लास ला दोन चमचे ही पावडर टाकली की सरबत तयार.
या आंबाडीच्या प्रॉडक्ट्स मध्ये
No Preservatives
No Added Flavour
No Added Colour

नैसर्गिक रंग, नैसर्गिक चव…

◆पेरु चॉकलेट- चॉकलेट हे मुलांचे आवडते खाद्य आहे. म्हणून उत्तम चॉकलेट मुलांना देण्याच्या उद्देशाने आम्ही चॉकलेट बनवण्याचे ठरवले. पेरु हा चांगला पर्याय वाटल्याने आम्ही पेरुची चॉकलेट बनवतो. ही चॉकलेट पिकलेल्या पेरु पासून बनवतो. म्हणजे फक्त पेरुच्या हंगामातच बनतात. कोणताही इसेन्स वापरत नाही. कोणतेही Preservatives नाही.

◆ मसाला बोरं- गावराणी बोरं ही खाण्यासाठी मस्त आहेत. त्यात Vitamin C मोठया प्रमाणावर असते. आजकाल गावरान बोरं खाण्याचे प्रमाण ही कमी झालेले आहे. आपल्या भागात बोरांचे प्रमाण खूप आहे म्हणून मग मसाला बोरं करण्याचे ठरवले. पिकलेल्या बोरांपासून मसाला बोरं बनवतो.
मुखवास म्हणून हे उत्तम आहे कारण यात जिरे, मिरे, काळ मीठ, सैंधव, ई आहे.

◆पूडचटणी- ही आंध्रप्रदेशची विशेषतः आहे. सर्व डाळी भाजून बनवलेली ही चटणी पौष्टिक आहे.

◆मेतकूट- डाळी पासून बनवलेले मेतकूट हे गरम।भातावर खाण्यासाठी उत्तम असते.

◆टमाटे-पोहे वडे/ सांडगे- आपल्या शेतातील टामाट्या पासून बनवलेले हे खुसखुशीत सांडगे खिचडी बरोबर तळून खायला मस्त लागतात.

अजूनही काही प्रॉडक्ट्स तयार करण्याचा विचार आहे.

शेती व छोटे उद्योग हेच अनेक हातांना काम देऊ शकतात. त्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. इंडस्ट्रियल structure एका टप्प्याच्या पलीकडे माणसांना सामावू शकत नाही. Mechanisation मुळे ती शक्यता अजून कमी होतं आहे.
त्यामुळे माणसांच्या हाताला काम देणाऱ्या यंत्राची निर्मिती करुन छोट्या उद्योगांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
आजच्या परिस्थिती मध्ये हे म्हणणे विचित्र वाटेल. पण जगण्याच्या पद्धतीचा विचार, Why चा विचार केल्याशिवाय सर्वांगीण विकसित होता येणार नाही.
नाहीतर आजचा Materialistic विकास आहेच त्याच्या अनेक प्रॉब्लेमसह….

मंदार देशपांडे
9420415648
mandar9999@gmail.com


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik