मिशन सुर्योदय अंतर्गत आयोजित छोट्या मुलांसाठी दिवाळीचा आकाश दिवा बनवायला शिकविण्याचा उपक्रम.

Date: October 14th, 2019 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Bhartiya Sanskriti, Education, Latest News, Wardha, World News
मिशन सुर्योदय अंतर्गत आयोजित छोट्या मुलांसाठी दिवाळीचा आकाश दिवा बनवायला शिकविण्याचा उपक्रम.

दि.१३ सप्टेंबर १९ रोजी मिशन सुर्योदय अंतर्गत बालगोपाळांना आकाश कंदिल बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले या वेळी पालकांनी सुध्दा मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या सुरवातीस सौ.मंगलाताई श्रौती यांनी मुलांना दिवाळीच्या प्रत्येक दिवसासाचे महत्व समजावून आजीची भुमीका पारपाडली. सौ. आरती श्रौती यांनी मुलांकडुन अत्यंत सोप्या पद्धतीने आकाश कंदिल बनवुन घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता उध्दव भुसारी, सारंग आपटे, भुषण अग्निहोत्री, मनोज पारखी, विवेक श्रौती, मनोज सहस्रबुध्दे, निलकांत देशमुख, निरज शिंगोटे, मंदार अभ्यंकर यांनी विशेष प्रयत्न केले.

बालगोपाळांमध्ये मित्रत्वाची भावना वृद्धींगत व्हावी या करीता मिशन सुर्योदय अंतर्गत नाविन्यपुर्ण कार्यक्रम राबविले जातात.


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik