आपला मेहनतीचा पैसा किती सुरक्षित???

Date: January 19th, 2020 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Mutual Fund, Politics, Share Market, Wardha
आपला मेहनतीचा पैसा किती सुरक्षित???

आपला मेहनतीचा पैसा किती सुरक्षित???

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणताच सर्व सामान्य ठेवीदारांच्या मनात पहिला विचार आला तो म्हणजे आपला मेहनतीचा पैसा किती सुरक्षित???

उत्तर आहे केवळ एक लाख रुपये!!!

आरबीआयच्या नियमा अंतर्गत जेव्हा कोणतीही बँक बुडते अथवा बंद करण्यात येते तेव्हा त्या बँकेच्या प्रत्येक ठेवीदारांच्या ठेवीवर + व्याजावर केवळ एक लाख रुपयांचा विमा असतो.

उदाहरणार्थ :- जर आपण १० लक्ष रुपये बँकेत ठेवी म्हणून ठेवलेले आहेत व त्याच्यावर व्याज पकडून त्याचे १४ लक्ष रुपये झाले आहे आणि नंतर बँक बुडाली तर आपणास केवळ १ लक्ष रुपयेच वापस मिळतील.

आता अशा परिस्थिती पासुन आपण स्वतःला कसे वाचवू शकतो???

१. राष्ट्रीयकृत बँकांमधेच आपला पैसा ठेवा.

२. एकाच बँकेत पूर्ण आयुष्यभराची कमाई न ठेवता वेगवेगळ्या बँकांमधे ठेवी करा.

३. १% आणि २% जास्त व्याज मिळवण्याच्या नादात कोणत्याही पत नसलेल्या बँके मधे पैसा ठेवू नका.

४. आरबीआयची मान्यता प्राप्त, सातत्याने नफ्यात असलेल्या व कमीत कमी एनपीए असलेल्या बँकेतच पैसा ठेवा.

ठेवी ठेवतांना वरील पॉईंट्सला न विसरता लक्षात ठेवा म्हणजे आपणावर कधीच पश्चातापाची वेळ येणार नाही.

नाही तर आपलाच पैसा आपल्यालाच मिळणार नाही!!!

वरील माहिती नक्कीच आपल्याला जन्मभर उपयोगी येईल यात शंका नाही.

आपलाच
प्रा.डॉ. श्रीकांत बावसे


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik