|| नमामि देवी नर्मदे ||

Date: February 3rd, 2020 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Bhartiya Sanskriti, General Knowledge, Latest News, Wardha
|| नमामि देवी नर्मदे ||

नर्मदेचा शाब्दिक अर्थ “आनंददायनी” असा होतो ,रामायण महाभारतात हिला ‘रेवा’ असे संबोधित होते. आशियाखंडातील लांब नद्यांपैकी पाचवा क्रमांक नर्मदेचा आहे. सातपुड्याच्या अमरकंटक पहाडात नर्मदेचा उगम झाला असून मध्यप्रदेश,महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांना संपन्न करणारी हि जीवनदायिनी आहे.

नर्मदेचे आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचे स्थान आहे, सप्त नद्या ज्या वेद पुराणात सांगितल्या आहे त्या पैकी नर्मदा हि महत्वाची नदी आहे
या नदीच्या काठाशी अमरकंटक,ओंकारेश्वर, महेश्वर,चौसष्टयोगिनी मंदिर आणि भृगु ऋषी यांचा आश्रम हि पवित्र तिर्थस्थाने आहे. पौराणिक कथेनुसार देव-दानव युद्ध समाप्त झाल्यावर विष्णू ब्रम्हां इंद्रादि देवता महादेव शिव चे दर्शनासाठी गेले आणि विनंती केली कि आम्ही केलेल्या पाप विमोचना साठी काही उपाय सांगा तेव्हा सदाशिवच्या भृकुटी मधून एक तेजबिंदू प्रगट झाला व त्यातूनच देवी नर्मदा प्रगट झाली

|| माघें च सप्तमया दास्त्रामे च रविदिने |

माध्यान्न समये राम भास्करेण कृमागते ||

अर्थात माघ शुक्ल सप्तमी ला मकर राशीतल्या सूर्य असतांना माध्यान्न समयी नर्मदेला जल स्वरूप प्रदान केले .सम्राट हिरण्यतेजा यांनी तप करून महादेवाला प्रसन्न केले आणि नर्मदेला पृथ्वी वर आणायची विंनती केली तेव्हा मगरासना वर विराजित नर्मदा मेखल पर्वतावर अवतरली आणि पश्चिमेकडे प्रवाहित होऊ लागली.

भारतात लहान मोठ्या असंख्य नद्या आहेत, पण विधिवत परिक्रमा फक्त नर्मदेचीच केली जाते, वैराग्याची अधिष्ठात्री नर्मेदेची परिक्रमा करतांना आध्यत्मिक दैवीय प्रचिती येत असते. मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती .पायदळ केल्यास हि यात्रा 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसात पूर्ण होते.

श्री विष्णूंनी नर्मदेला वर दिला आहे –

|| नर्मदे त्वं महाभागा सर्व पाप हरिभव |
त्वदत्यु या शिलाः सर्वा शिवकल्पा भवन्तु ताः ||

अर्थात हे नर्मदे तू महाभाग्यशाली, पापहरण करणारी हो,तुझ्या प्रवाहात प्रत्येक पाषाण शिवस्वरूप पूज्य होतील .
माघ शुक्ल सप्तमीला नर्मदा जयंती महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो, विभिन्न तटांवर दीपदान, काकड आरती आणि पुष्पवर्षा करण्यात येते .नर्मदा अष्टक ,चालीसा आणि आरती करून भाविक आपली कृतज्ञता व्यक्त करतात.

भारतात आधी कालापासून शक्ती पूजा करण्यात येते मग अशी शक्ती स्वरूपा जलदायनी जी लोक कल्याणार्थ दिवस रात्र प्रवाहित होत राहाते अशी आई नर्मदेचा जन्म दिवस भाविक उत्साहाने साजरा करतात.

त्वदिय पाद पंकजम,
नमामि देवी नर्मदे…..

 

लेखिका
सौ. रेणुका नीरज शिंगोटे
साई नगर, वर्धा

Recent Post

Blog Archive

Swastik Swastik