लठ्ठपणा : दैनंदिन उपाययोजना आणि होमिओपॅथिक उपचार

Date: February 5th, 2020 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Fitness, Health, Human Body, Obesity
लठ्ठपणा : दैनंदिन उपाययोजना आणि होमिओपॅथिक उपचार

लठ्ठपणा: बेजार करणारा आजार

लठ्ठपणा : दैनंदिन उपाययोजना आणि होमिओपॅथिक उपचार

नवीन वर्षाला सुरुवात होऊन एक महिना पालटला आहे.
किव्वा असे म्हणू या की नवीन वर्षाचे काही संकल्प करून त्याला एक महिना उलटला आहे.

नवीन वर्ष नवीन संकल्प…. हे समीकरण बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे….. समीकरण हा शब्द ह्यासाठी की ते समीकरण सोडविण्यासाठी बरीच तडजोड करावी लागते.

आणि थोडक्याच महानुभवांनी ते समीकरण उत्तम प्रकारे सोडविले आहे किव्वा त्या दिशेने सकारात्मक वाटचाल सुरू आहे.

परत महानुभव हा शब्द ह्यासाठीच वापरला कारण हे संकल्पिय समीकरण दररोज लक्षात ठेवून त्यावर अंमलबजावणी करणे, तडजोड करणे खूपच कठीण असते.

जवळपास 80% लोकांचा 2020 चा नवीन संकल्प हा फिटनेस (fitness) चा असतो त्यातल्या त्यात वजन कमी करण्याचा निर्धार जास्त असतो.

पहिले सुरुवात होते दीक्षित – दिवेकर पॅटर्न पासून…

#दीक्षित पॅटर्न (दिवसातून दोनच वेळा जेवणे)

#दिवेकर पॅटर्न (दिवसातून थोडे थोडे थोड्या अंतराने 8 वेळा खाणे)

त्यापैकी एक महिण्यात काही जण दीक्षित चे दिवेकर आणि दिवेकर चे हळूहळू उद्याकर… परवाकर… पुढील वर्षीकरु कडे रूपांतर झालेलं दिसते.

लठ्ठपणामुळे वजन कमी करणे हे बहुतांश शहरी व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे.
मग वजन कमी करण्याचे अनेक उपाय शोधणे सुरू होतात.

कधी वर्तमानपत्र किव्वा मासिकातून दिलेले उपाय तर कधी दूरचित्रवाणी वरील आरोग्यविषयक जाहिराती बघून त्याकडे आकर्षित होतो.

आजच्या 2020 च्या युगात मनुष्याचे मन पण असेच 20-20 च्या सामन्यांसारखे अधीर झाले आहेत.
सगळं काही फटाफट झाले पाहिजे.

मग वजन पण फटाफट कमी करण्यासाठी magical pills घेण्यात येतात….1 महिन्यात 5 ते 10 किलो कमी करण्याच्या नादात नको ते महागडे मॅजिक मेडिसिन घेण्यात येतात आणि महिन्याशेवटी वजनकाटा तिथेच अडकून पडल्याने महिन्याभरात 5 किलो वजन लगेच कमी होण्याचा क्षणिक आनंद क्षणात विरतो….ह्या 20-20 प्रकारात खिश्याचे वजन मात्र नक्कीच कमी झालेले दिसते.

लठ्ठपणाची कारणे

आधुनिक वैद्यकीय शास्त्रानुसार लठ्ठपणा ही एक जटिल व्याधी आहे. या व्याधीत मानवी शरीरात मेदाचे(Fats) प्रमाण इतके वाढलेले असते की त्याचा विपरीत परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. लठ्ठपणाची विविध कारणे आहेत ह्यात मुख्यत्वे शरीरात हार्मोन्स चा स्त्राव करणाऱ्या ग्रंथी जसे थायरॉईड, हायपोथालॅमस, इत्यादी ग्रंथींचे संतुलन बिघडते. ह्या व्यतिरिक्त काही विशिष्ट औषधीचे नियमित सेवन केल्याने सुद्धा लठ्ठपणा येतो. जसे गर्भ निरोधक गोळ्या, सतत अँटिबायोटिक चा वापर, काही कॉस्मेटिक औषधे अपायकारक ठरतात (संदर्भ- सायंटिफिक अमेरिकन एक्सप्रेस मॅगझीन दि.16/12/2009)

ह्याशिवाय धूम्रपान, मद्यपान, खाण्याच्या चुकीच्या सवयी, आहार-विहारात दोष, व्यायामाची कमतरता इत्यादी अनेक कारणे आहेत.

लठ्ठपणाचे शरीरावरील परिणाम

लठ्ठपणा मुळे व्यक्तीला डायबिटीस (Type-2), उच्चरक्तदाब (Hypertension), पित्राशयात खडे होणे, हृदयरोग, काही प्रकारचा कर्करोग, मासिक पाळीच्या समस्या, दमा , श्वास लागणे आणि मानसिक आजार इत्यादी अनेक आजाराला निमंत्रण देण्याची शक्यता खूप जास्त असते.

लठ्ठपणा कसा ओळखावा?

Body Mass Index (BMI) या द्वारे आपण व्यक्ती लठ्ठ आहे किव्वा नाही तसेच भविष्यात लठ्ठपणा सदर व्यक्ती बळी पडेल की नाही हे जाणून घेऊ शकतो.

BMI काढण्याचे सूत्र

BMI = Weight/Height square

(BMI = Kg/Meter square)

खालील तक्ता पाहून लठ्ठपणा ओळखता येतो

🔅वजन कमी (under weigt) < 18.5 🔅सामान्य वजन (Normal weight) 18.5 ते 24.9 🔅जास्त वजन (Pre Obese) 25 ते 29.9 🔅लठ्ठपणा (Obesity) 30 ते 39.9 🔅अतीलठ्ठपणा (Extremely Obese) >40

🔅🔅🔅🔅क्रमशः………

पुढील भागात आपण वजन कमी करण्यासाठी काय काय उपाययोजना करता येईल

त्यामुळे वजन कमी करण्याचा संकल्प केला नसेल तर करा आणि केला असेल तर तो पूर्णत्वास नेण्यासाठी सतत प्रयत्नरत रहा

Stay Fit
Stay Healthy

🙏🏻

डॉ आनंद गाढवकर
पत्ता:-
श्री रेणुका होमिओपॅथिक क्लिनिक आणि समुपदेशन केंद्र
डॉ सचिन पावडे हॉस्पिटल च्या बाजूला,
बॅचलर रोड, वर्धा – 442001, महाराष्ट्र, भारत
Email: anandgadhaokar@gmail.com
Mob: +91 9867926686


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik