शेअर्स मधे थेट गुंतवणुकीद्वारे मालक बनुन श्रीमंत बना

Date: February 10th, 2020 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Business, Business Management, General Knowledge, Politics, Share Market, World News
शेअर्स मधे थेट गुंतवणुकीद्वारे मालक बनुन श्रीमंत बना

।।श्री गणेशाय नमः।।

शेअर्स मधे थेट गुंतवणुकीद्वारे मालक बनुन श्रीमंत बना

मनुष्य श्रीमंत तेव्हाच होतो जेव्हा तो यशस्वी उद्योगाचा मालक बनतो. माझ्या मागील ब्लॉग नुसार आज आपण स्विमिंग पुल नंतर नदी मधे पोहण शिकणार आहोत. म्हणजेच शेअर्स मधे थेट गुंतवणूक कशी करावी हे जाणणार आहोत.

आपण सर्व यशस्वी कंपन्यांचे शेअर्स विकत घेऊन त्यांचे अंशतः मालक बनु शकतो आणि कंपनीच्या नफ्याचे भागधारक.

आज भारतीय शेअर मार्केट मधे हजारों कंपनीज आहेत. यातील यशस्वी कंपनी कशी ओळखावी हा मोठा यक्ष प्रश्न!

तर याचे उत्तर तुम्हाला मी आजच्या आपल्या ब्लॉग द्वारे देणार आहे.

तसेच आजवर आपण हाय रिस्क हाय रिटर्न ही संज्ञा ऐकली असेल पण आज मी आपणास लो रिस्क हाय रिटर्न कसे शक्य आहे हे सांगणार आहे.

शेअर मार्केट मधे गुंतवणूक करताना अशा कंपनीज चे शेअर्स घ्या ज्याच्या प्रोडक्ट्स ची गरज सर्वानाच आहे.

उदाहरणार्थ आंघोळ व कपड़े दोघांकरीता लागणारे साबण बनवीणारी कंपनी.

काय आहे न गरज सर्वांनाच?

भारत पाकिस्तान चे युद्ध हो
कि अमेरिका ईरान चे युद्ध,
लोक आंघोळ करण बंद करणार नाही किंवा कपड़े धुण पण बंद करणार नाहीच नाही.
त्यामुळे साबण बनवीणारी कंपनी तोटयात जाण्याची किंवा डूबण्याची शक्यता अतिशय कमी.

आणखी एक उदाहरण घेऊ या,
जगात आर्थिक मंदी आली तर किती लोक सकाळी ब्रश नाही करणार सांगा???

सर्वच करतील न…मग आपल्याला अशाच कंपनीज चे शेअर्स घ्यायचे आहेत ज्याच्या प्रोडक्ट्स ची डिमांड अखंड आहे.

आता अशा प्रोडक्ट्स बनवीणाऱ्या कंपन्यासुद्धा अनेक आहेत तर त्यांमधुन नेमक्या कोणत्या कंपनी चे शेअर्स घ्यावे? तर उत्तर आहे त्या सेक्टर च्या सर्वात

मोठ्या, सर्वात नामवंत कंपनीज चे!

चला लागा मग आता कामाला…

शोधा…
असे कोणते प्रोडक्ट्स आहेत ज्यांची गरज रोज सर्वांनाच आहे???
आणि त्या प्रोडक्ट्स बनवणारया सर्वात मोठ्या कंपन्या कोणत्या???

अशा कंपन्या शोधल्या नंतर त्यामधे आपण गुंतवु इच्छीत असलेल्या रकमेच्या फक्त ५ ते १०% हिस्सा गुंतवा.
उर्वरित गुंतवणूक कशात करावी यासाठी पुढील रविवारचा आपल्या ‘आम्ही ब्राह्मण’ चा ब्लॉग वाचायला विसरु नका.

आपल्या सर्व शंका व प्रश्न यांचे उत्तर देण्यास आम्हाला नक्की आवडेल.

आपलाच
प्रा. डॉ. श्रीकांत बावसे
वर्धा
भ्रमणध्वनी: +९१ ८९९९०४२१५७


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik