वजन कमी करण्यासाठी काही उपाययोजना

Date: February 14th, 2020 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in General Knowledge, Health, Human Body, Obesity
वजन कमी करण्यासाठी काही उपाययोजना

1- पूर्ण धान्य (whole grain) हे तुमच्या आहारातील मित्र समजा.

पूर्ण धान्य प्रकार आहारात नियमित सेवन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. उदा- गव्हाची पोळी, गव्हाची ब्रेड (brown bread), ओट धान्य पूर्णपणे पचायला वेळ जास्त लागतो. ज्वारीची भाकरी पण एक उत्तम पर्याय आहे. पचायला हलके असते. पूर्ण धान्य मुळे भूक लवकर लागत नाही, मुख्यत्वे गोड खाण्याची इच्छा होत नाही.

2- भूक आणि आहार पद्धत ओळखा

तुम्ही रोज कोणत्या प्रकारचा आहार किती प्रमाणात सेवन करता? आहारात कोण कोणत्या अन्नपदार्थ समावेश असतो? दिवसातून किती वेळा जेवता? नाश्ता कोणता आणि किती करता? चहा ह्या सर्वांचे वेळापत्रक तय्यार करा. त्याआधारे तुम्हाला वजन कमी करण्याचे नवीन वेळापत्रक तय्यार करता येईल.

3- मानसिकदृष्ट्या कणखर व्हा

इतरांना सांगण्यात लाजू नका की मी वजन कमी करतोय. कारण शेवटी शरीर हे तुमचेच आहे… आणि लठ्ठपणा चा त्रास पण तुम्हालाच होईल.
वजन कमी करण्याबाबतची चर्चा तुमच्या कुटुंबात व तुमच्या मित्रपरिवारात करा जेणेकरून तुम्ही उद्दिष्टापासून भरकटल्यास हीच मंडळी तुम्हाला जाणीव करून देईल.

4- पाण्याला प्रभावी शस्त्र बनवा

तूम्हाला जेव्हाही भूक लागेल तेव्हा पाणी प्या किव्वा जेवणापूर्वी भरपुर पाणी प्या. हा अगदी सोपा उपाय आहे. की जेणेकरून तीव्र भूक लागली असता त्याची तीव्रता कमी होऊन पोट भरल्या सारखे वाटेल.

जास्त पाणी पिल्याने चया-पचय क्रियेचा (metabolism) वेग वाढतो

आणि त्यामुळे पचनक्रियेला लागणारी ऊर्जा (calories) जास्त खर्च होते.

5- मीठ आणि साखर टाळा

शरीरात मोठ्या आतड्यामध्ये पाण्याचे अडकन (retenstion) करणे हे मिठाचे कार्य आहे शिवाय मीठ रक्तदाब वाढविते त्यामुळे घाम जास्त येतो. घाम गेला की तहान वाढते व ती शमविण्यासाठी आपण साखर मिश्रित सरबत, थंडपेय, लस्सी पितो आणि शरीरात जास्तीच्या कॅलरीज साठवितो. लठ्ठपणात मिठाप्रमाणेच साखर हे एक प्रकारचे विष समजल्या जाते. लठ्ठपणात शरीरातील साखर कशी जाळता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे. जर तुम्ही गोड पदार्थविना राहूच शकत नसाल तर असे मिष्ठांन सकाळच्या वेळी च सेवन करणे हिताचे राहील कारण ह्याच कॅलरीज नंतर दिवसभर वापरू शकू.

6- तंतुमय पदार्थांचा (fibre food) वापर वाढवा

आपल्या रोजच्या आहारात तंतुमय पदार्थांचा वापर वाढविल्याने आपणास योग्य प्रमाणात आवश्यक कॅलरीज मिळतात. तंतुमय अन्नघटकांचे दोन प्रकार असतात.

मिश्रित आणि अमिश्रित

मोठ्या आतड्यांमध्ये मिश्रित तंतुमय पदार्थ लवकर पचते आणि यामधून भरपूर प्रमाणात पाणी शोषल्या जाते. त्यामुळे पोट भरल्याची अनुभूती लवकर होते. अमिश्रित तंतुमय पदार्थ हिरव्या पालेभाज्या, काकडी, गाजर, मुळा, बिट, कांदा इत्यादी मध्ये सापडते. ते पचायला थोडा जास्त अवधी लागत असल्याने भूक लवकर लागत नाही.

7- सतत अल्पहाराची (snacking) सवय मोडा

काही काम नाही म्हणून अवेळी खात बसने योग्य नाही. विशेषतः दूरचित्रवाणी (TV) बघतांना अल्पहार करण्याची सवय अनेकांना असते. वजन कमी करण्यासाठी अल्पहार करणे ही चूक तर अक्षम्य अशी आहे. यावर नियंत्रण करायचे असल्यास त्यावेळी पाणी प्यावे, शुगर फ्री चुईंग गम खावे, बिना साखरेचं हर्बल चहा प्यावा. परंतु सकाळची न्याहारी (Breakfast) अवश्य करावा.

8- नियमित व्यायाम करा

व्यायाम नियमित केला तरच त्याचा इष्ट परिणाम शरीरावर दिसेल अन्यथा सर्व व्यर्थ आहे. विशेषतः गृहिणींना बाहेर जाऊन व्यायाम करणे, फिरणे यासाठी वेळ काढणे कठीण असल्यास अश्या स्त्रियांनी घरीच जिन्याच्या पायऱ्या चढ उतार करणे खूप चांगला व्यायाम आहे. ह्यात पायाला, कमरेला व गुडघ्यांना तर योग्य हालचाल मिळतेच शिवाय अतिरिक्त कॅलरीज सुद्धा नष्ट होतात. या व्यतिरिक्त बाजारात भाजी व इतर सामान आणण्यास पायी जाणे योग्य आहे. जेवणानंतर काही वेळाने निदान 20 मिन पायी फिरावे.

…दररोज आपले शरीर आरस्यात बघा व सकारात्मक प्रयत्नाने वजन कमी करण्याबाबत आत्मविश्वास वाढवा.

वरील सर्व उपाययोजना करतांना तुमच्या शरीराला आवश्यक असणारे प्रथिने, जीवनसत्त्वे, मेद हे नियमित घेतलीच पाहिजे. वजन कमी करण्याच्या अतिरेकी नादात आपण आपल्या शरीरावर एक प्रकारचा अत्याचारच करीत असतो. जर आहारतज्ज्ञच्या सल्ल्यानुसार आहारात बदल केले नाही तर एकदम वजन कमी होणे हे सुद्धा घातकच ठरू शकते.

🔅लक्षात ठेवा…

“वजन कमी करणे ही एक संथ गतीने होणारी नियमित प्रक्रिया आहे.”

🔅आहाराबाबत एक विशेष…

“कोणतेही अन्न पदार्थ हे चांगले किव्वा वाईट नसते, तर वाईट असते ती आपली खानपान पद्धती”

.

क्रमश……..

आता ह्यावर होमिओपॅथिमध्ये काय काय उपचार आहेत की पुढील भागात बघू या

Stay Fit
Stay Healthy

🙏🏻

डॉ आनंद गाढवकर
पत्ता:-
श्री रेणुका होमिओपॅथिक क्लिनिक आणि समुपदेशन केंद्र
डॉ सचिन पावडे हॉस्पिटल च्या बाजूला,
बॅचलर रोड, वर्धा – 442001, महाराष्ट्र, भारत
Email: anandgadhaokar@gmail.com
Mob: +91 9867926686


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik