उगवत्या सुर्याला नमस्कार करा आणि श्रीमंत व्हा!!!

Date: February 18th, 2020 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Business, Business Management, Share Market, Wardha, World News
उगवत्या सुर्याला नमस्कार करा आणि श्रीमंत व्हा!!!

🙏🙏श्री गणेशाय नमः🙏🙏

उगवत्या सुर्याला नमस्कार करा

आपल्या हिन्दू संस्कृति नुसार आपण रोज सकाळी उगवत्या सुर्याला अर्घ्य देऊन नमस्कार करत असतो. याने आयु, प्रज्ञा, बल, वीर्य यांची वृद्धि होते यात शंका नाही. याच प्रमाणे आपल्याला शेअर मार्केट मधेसुद्धा ज्या कंपनीज चे शेअर्स वर जात आहेत त्यांमधेच आपली गुंतवणुक करायची आहे.

काही विश्लेषक ज्या शेअर्स ची किंमत खाली आलेली आहे त्यांना विकत घ्या असा सल्ला देतात. परंतु कोणत्याही शेअर च्या किंमती खाली येण्या मागे अनेक कारण असतात.

शेअर्स च्या किंमती खाली वर कशा होतात??? हा सामान्य गुंतवणूकदारांसाठी फार मोठा प्रश्न!

उत्तर सोप आहे. खरीददार आणि विक्रेते यांपैकी कोण जास्त ताकदवर आहे?
म्हणजेच जर कंपनीच्या शेअर्स खरेदी करणाऱ्यांची मागणी जास्त असेल तर दर वाढतील.
आणि शेअर्स विक्री करणाऱ्यांची संख्या जास्त असेल तर दर खाली येतील.

आज भारतीय शेअर मार्केट हे जगातील सर्वात मोठ्या शेअर मार्केट पैकी एक आहे. ज्याची फक्त एका दिवसाची उलाढाल ५ लाख करोड़ पेक्षा जास्त आहे. मग कोणत्याही मोठ्या कंपनीच्या शेअर ची किंमत कमी जास्त उगाच होत नाही. त्यामागे मोठ मोठ्या आंतरराष्ट्रीय आणि भारतीय वित्तीय संस्थाचे खरेदी विक्री चे प्रमाण व विश्लेषण असते.

जेव्हा कंपनी ची विक्री, तिचा नफा इत्यादि जास्त होत असतो तेव्हा विविध गुंतवणूकदार शेअर्स विकत घेतात आणि कमी होतो तेव्हा विकतात. याच प्रमाणे दर कमी जास्त होण्याची अशी शेकडो कारण असतात. परंतु ही सर्व कारणे रोज थेट शेअर च्या किंमती मधे परावर्तित होत असतात. त्यामुळे नेहमी ज्या कंपनी चे शेअर्स वाढत आहेत त्यांनाच विकत घ्या.

Don’t catch the falling knife” या टेक्निकल एनालिसिस च्या नियमानुसार खाली पड़णाऱ्या चाकूला पकड़णयाचा प्रयत्न करू नका. नाही तर हात कापेल. म्हणजेच खाली येणाऱ्या शेअर्स ला विकत न घेता वर जाणाऱ्या शेअर्स ला विकत घ्या.

उगवत्या सुर्याला नमस्कार करा आणि श्रीमंत व्हा!!!

आपल्या वेबसाइट वरील ब्लॉग आवडला असल्यास नक्की लाइक, कॉमेंट आणि शेअर करा.

🙏🙏जय श्री महालक्ष्मी🙏🙏

आपलाच
प्रा. डॉ. श्रीकांत बावसे
वर्धा
भ्रमणध्वनी: +९१ ८९९९०४२१५७


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik