लठ्ठपणावर – होमिओपॅथिक उपचार

Date: February 27th, 2020 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Health
लठ्ठपणावर – होमिओपॅथिक उपचार

…. आतापर्यंत आपण
🔅लठ्ठपणा म्हणजे काय?
🔅तो कसा ओळखावा?
🔅कसा calculate करावा (BMI)?
🔅लठ्ठपणाची सर्वसाधारण कारणे?
🔅लठ्ठपणामुळे होणारा त्रास काय आहे?
🔅तसेच आपण काय काय उपाययोजना करू शकतो

…. ह्यावर प्रकाश टाकला आहे…..

आता बघू या

लठ्ठपणावर – होमिओपॅथिक उपचार

लठ्ठपणा कमी करण्याचा सर्वात योग्य मार्ग जरी नियमित व्यायाम व संतुलित आहार असला तरी प्रत्येक लठ्ठपणा ची कारणे वेगवेगळी असतात.

बरेचदा काही शारीरिक व्याधीने वजन वाढते त्यामुळे सोबत औषध उपचार करणे गरजेचे असते.

होमिओपॅथिक उपचार पद्धतीने लठ्ठपणावर यशस्वीपणे मात करता येते. होमिओपॅथिक औषधे शरीरातील चयापचय क्रियेला वेग देते, शरीरातील ग्रंथींचे कार्य सुरळीत करण्यात मदत करते, पाचन क्रिया सुधारते, पोट साफ होण्यास मदत होते, त्यामुळे इतर विषारी मळ शरीरात साठत नाही. तुम्हाला कल्पना असेल की होमिओपॅथिक वैद्यक शास्त्रामध्ये रुग्णाची सखोल नुसती शारीरिक नाही तर मानसिक स्थितीची पण योग्य दखल घेतल्या जाते.

खालील काही होमिओपॅथिक औषधी बद्दल माहिती-

 1. नक्स वोमीका (Nux vom)-
  जर रुग्ण नियमित मद्यपान करीत असेल व शारीरिक हालचाल कमी असेल, बैठे काम अधिक असेल अश्यांना लठ्ठपणाने ग्रासल्यास हे औषध उपयुक्त ठरू शकते.

 2. कॅलकेरिया कारब (Calc carb)-
  व्यक्तीची जर चयापचय क्रिया खूप मंद असेल, अंडी खाण्याची खूप सवय असेल. तसेच1 लहान मुलांमध्ये स्थूलता लवकर येणे, त्यांची मानसिक वाढ (Mile stones) जरा उशिरा विकसित होत असेल. अश्या लहान स्थूल मुलांना हे औषध खूप उपयुक्त ठरू शकते.

 3. फेरम फोस (Ferr phos)-
  स्त्रियांच्या बीजरोधन काळात (menopausal age) म्हणजे मासिक पाळी बंद होण्याच्या काळात शरिरात बरेच बदल होतात, harmonal imbalance मुळे येणारा लठ्ठपणा ह्या औषधाने कमी होऊ शकतो. तसेच ह्या रुग्णांमध्ये रक्ताची कमतरता पण असते.

 4. नट्ररुम फोस (Nat phos)-
  हे औषध मानसिक तणाव किव्वा नैराश्याने आलेला लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते.

 5. ह्याशिवाय काही होमिओपॅथिक mother tinctures पण शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्याचे काम करते.

तसेच ग्राफिटिस, लायकोपोडीअम, थुजा, कॅपसिकं, सेपीया इत्यादी अनेक प्रभावी औषधे होमिओपॅथि मध्ये उपलब्ध आहेत.

पण self-medication करणे अत्यन्त धोकादायक असू शकते.
कारण थोडे फार ज्ञान हे नेहमीच घातक ठरू शकते.

त्यामुळे वरील माहिती दिलेली होमिओपॅथिक औषधे तज्ञ डॉक्टर च्या सल्ल्यानेच घेणे हितकारक ठरेल.

शेवटी इतकेच की ….. औषधे फक्त 50% प्रभावी ठरतील बाकी 50% स्वतःलाच झिजवावे लागेल ह्यात दुमत नाही आणि कुठलीच पळवाट पण नाही.

चला तर संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू या आणि स्वस्थ-सुदृढ बनू या.

सर्वांना शुभेच्छा

Stay Fit
Stay Healthy

🙏🏻

डॉ आनंद गाढवकर
पत्ता:-
श्री रेणुका होमिओपॅथिक क्लिनिक आणि समुपदेशन केंद्र
डॉ सचिन पावडे हॉस्पिटल च्या बाजूला,
बॅचलर रोड, वर्धा – 442001, महाराष्ट्र, भारत
Email: anandgadhaokar@gmail.com
Mob: +91 9867926686


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik