जागतिक महामारी – मंदी मधे संधी !

Date: April 20th, 2020 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Corona, Latest News, Share Market, Wardha, World News
जागतिक महामारी – मंदी मधे संधी !

।।श्री गणेशाय नमः।।

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्या पासून कोरोना संक्रमणाने संपूर्ण जगात थैमान घालायला सुरुवात केली. कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीचे पडसाद सर्वप्रथम पडतात ते स्टॉक मार्केटवर. कारण येथे करोड़ो गुंतवणूकदारांचे अरबों रुपये गुंतलेले असतात.

मार्च चा शेवटचा आठवडा येता येता कोरोना ने भारताला गाठले आणि भारतीय शेअर बाजार याला अपवाद नाही ठरला. सर्व शेअर्स च्या किंमती ५०-६०% कमी झाल्या. आणि नवीन गुंतवणूक़दरांसाठी जणू सुवर्णसंधीच चालून आली.

परंतु आता कोविद – १९ दरम्यान कोणत्या शेअर्स मधे गुंतवणूक करावी?

शेअर मार्केट इतके खाली आले आहे तर कोणते शेअर्स घ्यावे?

कोणते शेअर्स कोरोना गेल्यावर लवकर चांगला परतावा देतील?

यासारखे प्रश्न सतत सामान्य गुंतवणूकदारांद्वारे विचारण्यात येत आहे. याच सर्व प्रश्नांची उत्तरे आज या ब्लॉग द्वारे देण्याचा मी प्रयत्न करत आहे.

पहिले क्षेत्र ज्यामधे आपण गुंतवणूक करू शकता ते म्हणजे शेती व तत्सम व्यवसाय!

लॉकडाऊन असताना सुद्धा सर्व लोक जेवण करतच आहेत. भारता जवळ पुढील ६ महीने पुरेल इतका मोठा धान्यसाठा आहे. किंबहुना भारत इतर देशांना सुद्धा खाद्यान्न निर्यात करू शकतो इतकी भारताची ताकद आहे. उगीचच भारताला ‘सुजलाम सुफलाम’ म्हणण्यात नाही येत.
आता पण शेतीशी जुळलेले सर्व व्यवसाय ९०% सुरुच आहेत.

येणाऱ्या महिन्यांमधे असे अनेक देश राहतील जे महामारी मुळे भारताला अन्नधान्य मागतील त्यामुळे शासनसुद्धा निर्यात वाढविणयासाठी शेतीला आणखी जास्त प्राधान्य व सवलती देईल.

शेतीशी जुळलेले व्यवसाय जसे इंसेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स इ. कंपनीज चे शेअर्स येत्या काळात जस जसा पुढील हंगाम जवळ येईल तसा तसा निश्चितच चांगला परतावा देतील.

दुसरे क्षेत्र म्हणजे फार्मा!

कोरोनामुळे भारतीय औषधी निर्माण क्षेत्र जगातील सर्वात सक्षम फार्मा क्षेत्र म्हणुन उदयास आले आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन सारख्या आर्थिक महासत्ता आज भारताला औषधी मागत आहे. आणि भारत त्यांना निर्यातसुद्धा करत आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध भारत जणू जगभर निर्यात करत आहे.

या शिवाय सर्दी, खोकला, ताप ही कोरोना ची लक्षण असल्यामुळे यांचे औषधसुद्धा भारताकड़ून संपूर्ण जग आयात करत आहे.

कोरोना अमेरिका, इटली, फ्रांस, स्पेन सारख्या देशात किमान ५ वर्ष तरी राहणार. त्यामुळे यांची मागणी निरंतर वाढणार आणि पुढील ५ वर्ष औषधि निर्माण क्षेत्रासाठी सुवर्णकाळ ठरेल.

तिसरे क्षेत्र – एफएमसीजी !

नाव जरी कठिण वाटत असले तरी अर्थ सोप्पा आहे. दैनंदिन लागणाऱ्या वस्तु उत्पादन करणारे क्षेत्र. जसे टूथपेस्ट, आंघोळ/कपड़े/भांडे यांचे साबण, तेल,पावडर, बिस्किट्स, खाण्यापिण्याच्या वस्तु इ. बनविणाऱ्या कंपन्या.

यामधे सर्वात मोठी मागणी आता वाढली आहे ती हैंडवॉश आणि सँनिटायझर्स ची. आता ही मागणी निरंतर वाढत जाणार यामधे तीळमात्र शंका नाही. भारतीय शेअर बाजारात अशा अनेक कंपनीज आहेत ज्या यापैकी अनेक वस्तु अत्यंत दर्जेदार पद्धतीने बनवतात.

आणखी महत्वाची नोंद येथे घ्यावी लागेल ती म्हणजे तुतवड़ा पडेल या भीतीने होणारी अगाऊ खरेदी!
ज्याचा प्रचंड फायदा या सर्व कंपनीज ला येत्या काळात नक्की होणार.

त्यामुळे वरील क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीज मधे दीर्घ अवधिसाठी, टप्प्या टप्प्याने गुंतवणूक करावी आणि लाभा चे भागीदार व्हावे.

श्रीमंत व्हा!

।।जगदंब उदयोस्तु।।

।।जय श्री महालक्ष्मी।।

आपलाच
प्रा. डॉ. श्रीकांत बावसे
वर्धा
८९९९०४२१५७


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik