श्रीमंतीचा राजमार्ग – २

Date: October 12th, 2020 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Latest News, Share Market, World News
श्रीमंतीचा राजमार्ग – २

प्राचीन काळापासून हिन्दू संस्कृति मधे सोन्याला अनन्य साधारण महत्व आहे. धनत्रयोदशी, दसरा, अक्षय तृतीया, गुरु पुष्य योग या सर्व सणांना आवर्जुन सुवर्ण खरेदी करायला पाहिजे असे शास्त्र सांगते.

आज मी आपणांस याच आपल्या संस्कृती नुसार सोन्यामधे गुंतवणूक करून आपण कसे श्रीमंत बनु शकतो हे सांगणार आहे.

रिजर्व बँक ऑफ इंडिया ने भारत सरकारच्या वतीने २०१५ साला पासुन “सोव्हरेन गोल्ड बॉन्ड” म्हणजेच एसजीबी च्या विक्रीस सुरुवात केली आहे. या मधे दरवर्षी २-३ वेळा आवश्यकतेनुसार आरबीआय हे बॉन्ड्स विक्रीस काढत आहे. यामधे केलेली गुंतवणूक ही सोन्याहुन पिवळी अशीच आहे. या बॉन्ड्स ची वैशिष्ट्य खालील प्रमाणे आहेत:-

  1. आपण कमितकमी १ ग्राम प्रमाणे या मधे गुंतवणूक करू शकता.
  2. १२ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या दरम्यान हे बॉन्ड्स गुंतवणुकीसाठी उपलब्ध राहतील.
  3. यासाठी ₹५००० प्रति ग्राम ईलेक्ट्रॉनिकली तर ₹५०५१ प्रति ग्राम फिजिकली असा भाव निश्चित करण्यात आला आहे.
  4. या बॉन्ड्सला ५ वर्षाचा लॉक इन पीरेड आहे. म्हणजे ५ वर्ष तुम्ही ही गुंतवणूक काढू शकणार नाही.
  5. ८ वर्षानी या बॉन्ड्स ची मुदत संपुन आपल्याला आपले पैसे त्यावेळेसच्या सोन्याच्या भावानुसार परत मिळतील.
  6. सर्वात महत्वाचे या ८ वर्षानमधे आपणास २.५% प्रति वर्ष या प्रमाणे व्याज मिळेल.
  7. अत्यंत महत्वाचे ८ वर्षानी याद्वारे मिळणारे उत्पन्न हे टॅक्स फ्री असेल.

या बॉन्ड्स मधे गुंतवणूक कशी करायची?

प्रमुख नँशनलाइज आणि प्रायव्हेट बैंक्स, पोस्ट ऑफिस किंवा डीमैट एकाउंट मधे आपण यामधे गुंतवणूक करू शकता. लक्षात ठेवा इलेक्ट्रानिकली गुंतवणूक केल्यास चोरीची भीति नाहीशी होते. तसेच लॉकरचा सुद्धा खर्च वाचतो.

आता बघुया परताव्याकडे😀

मागील ऐतिहासिक किंमतीचा अभ्यास केला तर लक्षात येते की सोन्याचे भाव दर ४-५ वर्षा मधे दुप्पट होत आहेत. जर हाच ट्रेंड सुरु राहिला तर सोन्याचे भाव ८ वर्षानमधे आज असलेला ५० हजार प्रति तोळा हा भाव १ ते १.५ लाख रुपये प्रति तोळा राहिल.

या मधे रिस्क आहे का?

हो.

परंतु ती एकच म्हणजे सोन्याचे भाव कमी होणे.

परंतु याची शक्यता अतिशय कमी आहे. कारण सोन्याचे भाव हे जितकी आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता जास्त राहिल तितके जास्त वाढतात.

म्हणुन सोन्याकड़े आता फक्त दागिने म्हणुन न बघता गुंतवणूक म्हणुन सुद्धा बघा आणि श्रीमंत व्हा!!!

आपलाच
डॉ. श्रीकांत बावसे
८९९९०४२१५७
वर्धा.

🙏🙏जय श्री महालक्ष्मी🙏🙏


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik