अक्षय तृतीयेला करा सोन्यासारखी गुंतवणूक

Date: May 11th, 2021 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in General Knowledge, Investment, Latest News
अक्षय तृतीयेला करा सोन्यासारखी गुंतवणूक

🚩🚩🙏🙏श्री गणेशाय नमः🙏🙏🚩🚩

अक्षय तृतीयेला करा सोन्यासारखी गुंतवणूक

अनादी काळापासून आपल्या हिन्दू धर्मामधे साडेतीन मुहूर्ता पैकी पुर्ण एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. या दिवशी केलेल्या खरेदी चा कधीच क्षय होत नाही म्हणजेच त्यामधे घट होत नाही अशी मान्यता आहे.

माझ्या मागील स्तंभामधे आपण सोव्हरेन गोल्ड बॉन्ड मधे गुंतवणूक करून कसा दीर्घकालीन कर विरहीत दरवर्षी २.५% परतावा मिळवू शकतो याचे विश्लेषण केले होते.

आज मी या स्तंभामधे आपण शेअर्स मधे दीर्घकालीन गुंतवणूक करून कसे श्रीमंत होऊ शकतो हे बघणार आहोत. शेअर मार्केट मधे गुंतवणूक करण्याचे काही अत्यंत दुर्लभ असे नियम आज येथे मी सांगत आहे. या नियमांनी गुंतवणूक केल्यास आपण नक्कीच श्रीमंत व्हाल यात तीळमात्र शंका नसावी.

नियम १:-

कसे शेअर विकत घ्यावे?

आपल्याला स्वतःच्या उघड़या डोळ्यांनी ज्या कंपनीच्या वस्तुंचा खप होताना दिसत आहे तेच शेअर्स विकत घ्यावे.

उदाहरणार्थ:- MRF कंपनी चा टायर हा सर्वात जास्त दोन चाकी वाहनांसाठी विकल्या जातो. नवीन २ व्हीलर – टायर MRF चा..
टायर जुना झाला तरी नवीन घेतो MRF चाच… फुटला किंवा खराब झाला तरी MRF च!!!
या इतक्या साध्या सोप्या निरिक्षणाने ज्या पण व्यक्तिने फक्त १० वर्ष आधी MRF चा शेअर ३०००/- चा घेतला असेल तो आज तब्बल ९०,०००/- झाला आहे.

नियम २:-

असे शेअर विकत घ्या ज्याच्या उत्पादनांची आवश्यकता सर्वांनाच आहे.
वरील उदाहरण यासाठी पुरेसे आहे.

नियम ३:-

दर महिन्याला ठराविक रक्कम चांगल्या शेअर्स मधे गुंतवा

याने मार्केट वर गेले किंवा खाली गेले तरी तुम्हाला खरेदीची संधी मिळत राहिल.

नियम ४:-

कधीच एकदम मोठी रक्कम एका शेअर मधे गुंतवु नका.

वेगवेगळ्या उत्तम शेअर्स मधे दर महिन्याला गुंतवणूक केल्याने जर एक दोन कंपनी ने परतावा नाही दिला तर बाकीच्या कंपनी चे शेअर्स चांगला परतावा देतील.

नियम ५:-

दीर्घकालीन गुंतवणूक करा

ज्याप्रमाणे आपण बैंक मधे गुंतवणूक केल्यावर कमितकमी ८ वर्षे पैसा काढत नाही, प्लॉट किंवा फ्लैट घेतल्यावर लगेच विकत नाही तसेच शेअर्स घेतल्यावर सुद्धा त्यांना दीर्घावधीसाठी विसरून जा.

लक्षात ठेवा आपण आंब्याचे बी लावत आहे. १० वर्षात ते रोप मोठे होईल म्हणजे आपला पैसा वाढेल.
नंतर त्यालाच कैरया लागतील, आंबे लागतील, झाड़ आपल्याला सावली देईल आणि सोबत ऑक्सिजन सुद्धा म्हणजेच या शेअर्स मधील गुंतवणुकीतून आपल्याला बोनस, स्प्लिट, राइट्स, डिविडेंड, डीमर्जर सारखे लाभ मिळतील!!!

या दरम्यान अनेक वादळ येतील… गारपिट होईल परंतु आपले झाड़ सर्व सहन करत हळूहळू वाढत राहिल.

नियम ६:-

आपल्या सेक्टर मधील मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घ्या

ज्या प्रमाणे वादळांमधे मजबुत झाड़े टिकून राहतात त्याच प्रमाणे मोठ्या बलाढ्य कंपनीज चे शेअर्स घ्या. वेगवेगळे शेअर्स आंबा, वड, पिंपळ, कडुलिंब, कदंब सारखे विशाल होतील.

नियम ७:- मालक बना

आपण जेव्हा कोणताही व्यवसाय सुरु करतो तेव्हा त्याला एक दोन दिवसात किंवा महिन्यात बंद करत नाही. त्याच प्रमाणे जेव्हा आपण शेअर्स घेतो तेव्हा आपण तो व्यवसाय टाकला असुन त्याचे आंशिक मालक बनलो आहे असे समजा व त्या सोबत दीर्घकालीन अवधीसाठी सोबत रहा.

आज आपला भारत देश हा विश्वातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर घोड़दौड करत आहे. विदेशी गुंतवणुक़दार भारतात गुंतवणूक करून जबरदस्त पैसा कमवत आहे. मग आपणच स्वता: कशाला मागे रहायचे???

वरील नियमांचे तंतोतंत पालन करा आणि श्रीमंत व्हा!!!

💰💰💰💰💰💰💰💰💰

(कोणतीही गुंतवणुक करतांना आपल्या इन्वेस्टमेंट एडवाइजर चा सल्ला नक्की घ्या)

आपलाच,
डॉ. श्रीकांत बावसे
८९९९०४२१५७
वर्धा – 442001


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik