मिशन सूर्योदय अंतर्गत आयोजित लव्ह जिहाद या विषयी ब्राह्मण कुटुंबांचे समुपदेशन

दिनांक 19 जुलै 22 रोजी अभ्यंकर्स तंदुर येथे अॅड. मंजुषा देव (यवतमाळ) यांनी लव्ह जिहाद च्या नावाखाली ब्राह्मण मुलींची कशी फसवणूक केली जाते. यातून आपला बचाव करण्यासाठी कुठली खबरदारी घेतली पाहिजे यावर मुलींचे तसेच त्यांच्या सुजाण पालकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमा चे संचालन या वेळी महिला शक्तीने केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सौ.रूपाली अभ्यंकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देवून पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रम संचलन सौ.रेणुका शै.डेहाडराय यांनी तर मिशन सूर्योदय चे मिशन उपस्थित मंडळी ना सौ.किर्ती सा.आपटे यांनी अवगत करून दिले.
कु.वर्तिका वि.श्रौती हिने प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. सौ.अश्विनी भु. अग्निहोत्री आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी ते करीता शैलेश डेहाडराय,विवेकजी श्रौती,भुषण अग्निहोत्री,उध्दव भुसारी,सारंग आपटे व मंदार अभ्यंकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
काही क्षणचित्रे

